जाहिरात

Mumbai Rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस! सखल भागात पाणी साचलं, वाहतूक सेवा, लोकलची स्थिती काय?

Mumbai Rain Latest News: आजही शहरामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबई, ठाण्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. 

Mumbai Rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत तुफान पाऊस! सखल भागात पाणी साचलं,  वाहतूक सेवा, लोकलची स्थिती काय?

Mumbai Rain News: शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळाले. रात्रभर झालेल्या या धुवाँधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचे रुप आले असून त्यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची दमछाक होताना दिसत आहे. आजही शहरामध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून मुंबई, ठाण्यामध्ये हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. 

LIVE Update: मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! रस्त्यांवर पाणीच पाणी

मुंबईत शनिवार १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजेपासून ते आज १६ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत पाच तासात अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला. आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झालेली ठिकाणे खालीलप्रमाणे: (पावसाची नोंद मिलिमीटरमध्ये)

मुंबई शहर:

प्रतीक्षा नगर महानगरपालिका शाळा, शीव - १४४
वरळी सीफेस महानगरपालिका शाळा - १३७
दादर वर्कशॉप - १३७
दादर अग्निशमन दल - १३५
रावळी कॅम्प - १३५

पश्चिम उपनगरे -

मरोळ अग्निशमन दल - २१६
नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ - २१३
चकाला महानगरपालिका शाळा, अंधेरी - २०७
मालपा डोंगरी महानगरपालिका शाळा, अंधेरी - २०४
के पश्चिम विभाग कार्यालय - १९५

पूर्व उपनगरे -

टागोर नगर महानगरपालिका शाळा, विक्रोळी - २१३
इमारत प्रस्ताव कार्यालय, विक्रोळी पश्चिम - २११
एन विभाग कार्यालय - २०४
रमाबाई महानगरपालिका शाळा, घाटकोपर - २०४
एमसीएमसीआर, पवई - २००

आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा!

दरम्यान, आज मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी, पालघर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आत्तापर्यंत झालेल्या पावसाचा शहरातील वाहतूक तसेच लोकल सेवेवरही परिणाम झाला आहे. कुर्ला, दादर स्थानकांजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले आहे. तसेच काही गाड्या उशिरा धावत आहेत. पावसाचा जोर वाढणार असल्याने आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Maharashtra Rains: मुंबई, रायगडला अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा, BMC चं आवाहन

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com