जाहिरात
3 hours ago

Mumbai Rain Live Blog: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाचे थैमान पाहायला मिळाले. रात्रभर झालेल्या या धुवाँधार पावसाने शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कुर्ला, घाटकोपर परिसरात अनेक भागात रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. आज मुंबईमध्ये ठिकठिकाणी दहिहंडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. अशात आता पावसाने थैमान घातल्याने आयोजकांची तारांबळ उडणार आहे.  

Live Update : मुंबईमध्ये दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू, 75 जखमी

आज देशभर दहीहंडीचा उत्साह आहे. मंुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला. त्याचवेळी या उत्साहाला मुंबईत गालबोट लागलं आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान एकाचा मृत्यू झाला. जगनमोहन चौधरी असं मृत गोविंदाचं नाव आहे. संपूर्ण मुंबईमध्ये दहीहंडीच्या उत्सावाच्या दरम्यान 75 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामधील दोन गोविंदा गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. 

Live Update : पूर्णा नदीत उडी मारलेला आंदोलक 24 तासांनंतरही बेपत्ता

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प स्थळी शुक्रवारी (15 ऑगस्ट) आडोळ गावातील नागरिकांनी जलसमाधी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान विनोद पवार या आंदोलकाने पूर्णा नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली.  हा आंदोलक पूर्णा नदीतील प्रवाहात वाहून गेल्याने अद्यापही बेपत्ता आहे. शुक्रवारी स्थानिक आपत्ती मदत पथकाने या युवकाचा शोध घेतला,  मात्र अंधार पडल्याने ही मोहीम थांबवण्यात आली होती. आता शनिवारी (16 ऑगस्ट) सकाळी विनोद पवार या आंदोलकाचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा आपत्ती मदत पथकाने सुरुवात केली आहे.  जिगाव प्रकल्प स्थळी सध्याही मोठा पोलीस बंदोबस्त आहे.

Mumbai Rain LIVE: पावसामुळे लोकलवर परिणाम

मुंबईमध्ये सुरु असलेल्या धुवांधार पावसाचा लोकल सेवेवर परिणाम होत आहे. पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोकल गाड्या १५ मिनिटे उशिरा धावत आहेत. 

LIVE Update: बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगांव तालुक्यातील कोथाळा,साळेगाव,मोगरा, डाके पिंपरी,खतगव्हाण , उपरी,सिमरी पारगाव,पात्रुड ,नित्रुड , गंगामसला,किट्टी आडगाव,टाकरवण तालखेड , काल अचानक जोराचा पाऊस झाल्याने या भागात अतिवृष्टी सदृश्य  पाऊस काही भागात झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओढे वाहू लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. तर शेतामध्ये देखील पाणीच पाणी साचल्याच पाहायला मिळालं आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप आले आहे. उभी पिकं पाण्यामध्ये दिसत आहेत.

Mumbai Rain LIVE Update: गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबई पोलिसांनी X वर पोस्ट करून लोकांना अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे आणि अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागात पाणी साचल्याचे आणि दृश्यमानता कमी असल्याचे वृत्त आहे. मुंबईकरांना अनावश्यक प्रवास करू नका आणि बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Mumbai Rain Live Update मुंबईत समुद्राला आज आणि उद्या मोठी भरती

मुंबईत समुद्राला आज आणि उद्या मोठी भरती!

आज सकाळपासूनच समुद्राला उधाण आलं आहे

मुंबईत सध्या भरती-ओहोटी सुरू आहे. सकाळी ५:५४ वाजता सर्वाधिक भरती-ओहोटी (४.०४ मीटर) होती आणि सकाळी ११:४५ वाजता सर्वात कमी १.७२ मीटर भरती-ओहोटी असेल

Mumbai Rain Live Update मुंबईत समुद्राला आज आणि उद्या मोठी भरती

मुंबईत समुद्राला आज आणि उद्या मोठी भरती!

आज सकाळपासूनच समुद्राला उधाण आलं आहे

मुंबईत सध्या भरती-ओहोटी सुरू आहे. सकाळी ५:५४ वाजता सर्वाधिक भरती-ओहोटी (४.०४ मीटर) होती आणि सकाळी ११:४५ वाजता सर्वात कमी १.७२ मीटर भरती-ओहोटी असेल

Mumbai Rain LIVE Updates: आज मुंबईत सर्वाधिक पाऊस झालेली ठिकाणे

आज सकाळपासून मुंबईत सर्वाधिक पाऊस झालेली ठिकाणे:

Maharashtra Rain: वाशिम जिल्ह्याला पावसाचा फटका, पुरामुळे शेतीमालाचे नुकसान

वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यात काल सायंकाळी पुन्हा जोरदार  मुसळधार पाऊस झाला असून या दोन तालुक्यातील काही गावांना चालू हंगामात चौथ्यांदा पुराचा फटका बसला आहे.काल सायंकाळी सर्वाधिक मोठा फटका रिसोड तालुक्यातील केनवड, कुकसा, महागाव, पाचंबा, गणेशपूर, बोरखेडी इतर गावाला बसला तर मालेगाव तालुक्यातील वाघी, खंडाळा, शिरपूर, या भागातही जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळं बोरखेडी - गणेशपूर, खंडाळा -वाघी, केनवड - गणेशपूर हे मार्ग काहीवेळ बंद होते मात्र आता या मार्गावरील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानं या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली आहे.तर पाचंबा गावाजवळ नव्यानं बनवलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळं पाचंबा- गणेशपूर मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद आहे. या पुराचा हळद आणि सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे.

Mumbai Rain LIVE Update: मुंबईकरांनो काळजी घ्या, आज पावसाचा रेड अलर्ट

हवामान खात्याने आज मुंबईसह ठाण्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. रात्रभर झालेल्या धुवाँधार पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे. एकीकडे आज दहीहंडीचा उत्साह असतानाच पावसाने हजेरी लावल्याने चांगलीच दमछाक पाहायला मिळणार आहे. 

LIVE Blog: मनोज जरांगे पाटलांच हिंगोलीत जंगी स्वागत, जेसीबी च्या साह्याने जरांगेवर पुष्पवृष्टी

 मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी मनोज जरांगे हे आज हिंगोलीतील मराठा समाज बांधवांची संवाद बैठक घेणार आहेत, जरांगे पाटील यांचे हिंगोली मध्ये रात्री आगमन झाल्यानंतर हिंगोलीकरांनी जरांगे पाटलांच जंगी स्वागत केलय, हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात जेसीबीच्या साह्याने जरांगेवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे, दरम्यान आज सकाळी दहा वाजता जरांगे मराठा समाज बांधवांशी आंदोलनासंदर्भात संवाद साधणार आहेत 

LIVE Update: मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग

मुंबईमध्ये अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com