Maharashtra Rain : चार दिवस पावसाचे! हवामान विभागाकडून अलर्ट जारी

नवरात्र गाजवल्यानंतर दिवाळीतील दोन दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली. आज भाऊबीजेलाही पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Rain Update : नवरात्र गाजवल्यानंतर दिवाळीतील दोन दिवस पावसाने चांगलीच हजेरी लावली. आज भाऊबीजेलाही पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 21 ऑक्टोबर, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. दरम्यान पुढील चार दिवस हवामान विभागाकडून यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. 

नवरात्रौत्सवानंतर पाऊस परतेल असा अंदाज व्यक्त केला जात असताना यंदा दिवाळीत जुलै महिन्याप्रमाणे पाऊस पाहायला मिळाला, त्यामुळे अनेकांना संभ्रम निर्माण झाला आहे. परतीचा पाऊस कधी परतणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र अद्याप चार दिवस तरी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं संकेत व्यक्त केले जात आहे. 

नक्की वाचा - Rain Alert : मुंबईत धो-धो, बदलापुरात ढगफुटी सदृश्य पाऊस; पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अलर्ट

कुठे आणि कधी असेल यल्लो अलर्ट....

23 ऑक्टोबर - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशिम, अकोला, बुलढाणा

Advertisement

24 ऑक्टोबर -  मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा,अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर. 

25 ऑक्टोबर - पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, वाशिम, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली.

Advertisement

26 ऑक्टोबर - पुणे, सातारा घाट, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. 

देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा केली जात असतानाच मंगळवारी, बुधवारी राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढचे दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात वारे वाहत असल्याने मुंबई आणि इतर भागांमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे


 

Topics mentioned in this article