Maharashtra Rain Update : मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पहाटेपासून जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. दरम्यान आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या आकाशात काळे ढग दाटून आले असून आज दिवसभर पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय पुढील आठवडाभर हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला असून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे हवामान विभागाकडून सध्या तरी कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज किंवा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. आयएमडीकडून 7 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, हिंगोली यल्लो अलर्ट आहे. आज सकाळी 9.18 वाजता समुद्रात काही मिनिटांसाठी उंच लाटांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Pune News : धरणे तुडुंब मात्र कोथरूड 4 दिवस कोरडेठाक, आंघोळीचे वांदे झाल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेला दांड्या
22 जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर 23 जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड सह पुण्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे हा आठवडा पावसाचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.