राज्यातील शाळांमध्ये 15 जूनपासून 'एक राज्य, एक गणवेश' योजना लागू, हे आहेत नियम

Ek Rajya Ek Ganvesh: राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता 'एक राज्य, एक गणवेश' योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे. काय आहे नियमावली?

जाहिरात
Read Time: 3 mins

Ek Rajya Ek Ganvesh: राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्याशी संस्थांशी संबंधित असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता 'एक राज्य, एक गणवेश' योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे. या योजनेअंतर्गत शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  

 नियमित गणवेश स्काऊट आणि गाईड
1. इयत्ता पहिली ते चौथीच्या   विद्यार्थिनी  आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक
2 इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी  आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाचा स्कर्ट

 गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्रॉक

3 - इयत्ता सहावी ते आठवी मुली 
 - इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी   मुली (ऊर्दू माध्यम)
 आकाशी निळ्या रंगाची कमीज, निळ्या गडद रंगाची   सलवार व गडद   निळ्या रंगाची ओढणी गडद आकाश निळ्या रंगाची कमीज, गडद निळ्या   रंगाची सलवार, गडद निळ्या रंगाची ओढणी  
4 इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीचे   विद्यार्थी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पँट स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची हाफ पँट
5 इयत्ता आठवीचे विद्यार्थी  आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पँट   स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट व गडद निळ्या रंगाची फुल पँट

या योजनेअंतर्गत शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीचे  शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश 8 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहेत. तसेच वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षांपासून संबंधित योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्याबाबतचा शासन निर्णय 6 जून 2023 रोजी जारी करण्यात आला.  

(नक्की वाचा: Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडमुळे प्रवास झाला सुखकर, प्रवाशांना मिळणार हे फायदे)

कोणत्या दिवशी कोणता गणवेश परिधान करावा?

मोफत गणवेश योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना नियमित आणि स्काऊट गाईड विषयाचा गणवेश देण्यात येणार असल्याने शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी नियमित गणवेश तर मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी विद्यार्थ्यांनी स्काऊट व गाईड या विषयाचा गणवेश परिधान करावयास सांगण्यात आले आहे.  

(नक्की वाचा: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांची आवक घटल्याने दर कडाडले)

एका गणेशवाची किंमत किती?

राज्यातील शाळा 15 जून 2024 पासून सुरू होत आहेत. महिला बचत गटामार्फत सद्यस्थितीत नियमित गणवेशाची शिलाई सुरू आहे. स्काऊट गाईडच्या गणवेश शिलाईसाठी शंभर रुपये आणि अनुषांगिक खर्च 10 रुपये असे एका गणवेशासाठी एकूण 110 रुपये इतकी रक्कम संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने (मुंबई) वर्ग करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. 

Advertisement

(नक्की वाचा: धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, लोकांच्या घरात शिरले नाल्याचे पाणी)

One School One Uniform | राज्यातील सर्व शाळांमध्ये 'एक शाळा एक गणवेश' योजना लागू

Topics mentioned in this article