Dharashiv Rain: धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्याच पावसामुळे स्थानिकांना मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील फकिरा नगर भागातील अनेक घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारीसह अन्य अन्नधान्यांची पोती पाण्यात भिजली. घरात शिरलेले पाणी बादलीने उपसून बाहेर फेकण्याचा केविलवाणा प्रयत्न लोक करत आहेत. पावसामुळे या भागातील नाले तुडुंब भरले आहेत, त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे आणि हेच पाणी घरांमध्ये शिरल्याने स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
(नक्की वाचा: मान्सून आणि... ! महाराष्ट्रभरात पावसाची तुफान बॅटिंग; 'या' जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट)
दुसरीकडे धाराशिवमधील प्रसिद्ध हजरत खाजा शमशोदिन गाझी रहमतुल्ला दर्ग्यामध्येही पावसाचे पाणी शिरले आहे. रविवारी (9 जून) संध्याकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दर्ग्यामध्ये पावसाचे पाणी शिरले. दर्ग्यामध्ये पावसाचे पाणी शिरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
(नक्की वाचा: Vikhroli Slab Collapsed : विक्रोळीत स्लॅब कोसळून 10 वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू)
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातही शिरले पाणी
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातही पावसाचे पाणी शिरले आहे. पावसाच्या पाण्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील साहित्य भिजले. आपत्ती व्यवस्थापनामध्ये वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक बोट, दोरखंड आणि इतर साहित्य भिजून पूर्णपण त्याचे नुकसान झाले आहे. आपत्तीच्या काळात मदत करणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयासमोरच संकट उभे राहिले.
(नक्की वाचा: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, प्रशासनाकडून करण्यात आलंय हे आवाहन)
Vikhroli Slab Collapsed | सर्वात मोठी बातमी: विक्रोळीत बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world