राज्यभरात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. प्रचारही शेवटच्या टप्प्यात आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. सध्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. शिवाय निवडणुकीसाठी ड्यूटीवर असलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षणही सुरू आहे.
नक्की वाचा - Exclusive| रोखठोक सवाल, सडेतोड उत्तर, शरद पवारांच्या मुलाखतीमधील 5 मोठे मुद्दे
शिक्षण संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस आधी शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातली शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक ड्यूटीवर असल्यामुळे 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला शाळा चालविणे शक्य नसल्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. 18, 19,20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत शिक्षक निवडणुकीच्या ड्यूटीवर असल्याने शाळा भरवणे शक्य नसल्याने शाळा व्यवस्थापनाला राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र असल्याने तीन दिवस या शाळांना सुट्टी देण्याच्या सूचना आहेत.