जाहिरात

Green Crackers: 30 कोटींचा धूर! महाराष्ट्राच्या 'शिवकाशी'मध्ये ग्रीन क्रांती; जिथे फटाक्यांवर चालतंय, अख्ख गाव

Green Crackers:  दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण आता आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या पारंपरिक फटाक्यांना बाजूला सारून ‘ग्रीन फटाक्यां’ची एक नवी लाट आली आहे.

Green Crackers: 30 कोटींचा धूर! महाराष्ट्राच्या 'शिवकाशी'मध्ये ग्रीन क्रांती; जिथे फटाक्यांवर चालतंय, अख्ख गाव
Green Crackers: धाराशिव जिल्ह्यातलं गाव महाराष्ट्राचे शिवकाशी म्हणून ओळखले जात आहे.
मुंबई:

Green Crackers:  दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, पण आता आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या पारंपरिक फटाक्यांना बाजूला सारून ‘ग्रीन फटाक्यां'ची एक नवी लाट आली आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी उभं आहे महाराष्ट्राचं एक छोटंसं गाव – धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) जिल्ह्यातील तेरखेडा. हे गाव आज 'महाराष्ट्राचं शिवकाशी' म्हणून ओळखले जाते, कारण येथे दरवर्षी तब्बल 30 कोटी रुपये मूल्याचे फटाके तयार होतात आणि आता इथेही पर्यावरणपूरक ग्रीन फटाक्यांच्या उत्पादनाने जोर धरला आहे. याच तेरखेडा गावात एनडीटीव्हीची टीम पोहोचली आणि त्यांनी येथील प्रमुख फटाका उत्पादक तय्यब हुसेन दारूवाला यांची खास मुलाखत घेतली.

ग्रीन फटाके म्हणजे काय? 

ग्रीन फटाके म्हणजे असे पर्यावरणपूरक फटाके जे पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) यांनी हे फटाके विकसित केले आहेत. सण-उत्सवांच्या काळात, विशेषतः दिवाळीत होणारे वायू प्रदूषण कमी करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. पारंपरिक फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेट, आर्सेनिक, लीड यांसारखे घातक विषारी घटक वापरले जातात, ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याउलट, ग्रीन फटाक्यांमध्ये पोटॅशियम नायट्रेट किंवा इतर कमी हानिकारक ऑक्सिडायझरचा वापर केला जातो, ज्यामुळे पार्टिक्युलेट मॅटर (PM) उत्सर्जनात 30 ते 40 टक्क्यांपर्यंत घट होते.

Latest and Breaking News on NDTV

ओळखण्याची सोपी पद्धत

ग्रीन फटाके पूर्णपणे प्रदूषणमुक्त नसले तरी पारंपरिक फटाक्यांपेक्षा कमी धूर आणि कमी आवाज करतात. यांचा आवाज 125 डेसिबलपेक्षा कमी नियंत्रित केला जातो, ज्यामुळे ध्वनी प्रदूषणालाही आळा बसतो. या फटाक्यांमुळे वायू गुणवत्ता सुधारण्यास मदत होते, म्हणूनच सुप्रीम कोर्ट आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल (NGT) यांनी सणासुदीच्या काळात फक्त ग्रीन फटाक्यांनाच परवानगी दिली आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही ते अधिक फायदेशीर आहेत; कारण विषारी घटक कमी असल्याने श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि त्वचारोगमध्ये घट होते.

( नक्की वाचा : Diwali Tips and Tricks: मोठी समस्या संपली! घरात उंदीर असतील तर न मारता पळवून लावण्यासाठी लगेच वापरा ही ट्रिक )
 

खरे ग्रीन फटाके ओळखणे खूप सोपे आहे. ज्या फटाक्यांवर CSIR-NEERI चा लोगो, QR कोड, "Green Crackers" असा लेबल आणि पेट्रोलियम आणि एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन (PESO) चे प्रमाणपत्र असते, तेच अधिकृत ग्रीन फटाके असतात.

Latest and Breaking News on NDTV

महाराष्ट्राचे शिवकाशी

पूर्वी फटाक्यांचे उत्पादन प्रामुख्याने तामिळनाडूतील शिवकाशी येथे होत होते, पण आता महाराष्ट्रातील तेरखेडासारखी नवी केंद्रे झपाट्याने उदयास येत आहेत. तेरखेडा गावात फटाका उद्योगाची सुरुवात 1983 साली झाली आणि आज या गावात 200 हून अधिक फॅक्टऱ्या कार्यरत आहेत. इथे विविध प्रकारचे फटाके – अनार, फुलबाजी, रॉकेट, बम – तयार होतात. येथून तयार झालेले फटाके संपूर्ण महाराष्ट्रात घाऊक स्वरूपात पाठवले जातात. विशेष म्हणजे, बदलत्या काळानुसार अनेक फॅक्टऱ्या आता ऑनलाइन विक्री आणि थेट घरपोच डिलिव्हरीची सुविधाही देत आहेत, ज्यामुळे या उद्योगाची व्याप्ती आणखी वाढली आहे.

( नक्की वाचा : Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; दिवाळीत 'या' 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास 30% होईल फायदा! )
 

तेरखेडाच्या उद्योजकांनी केवळ परंपरा जपली नाही, तर ग्रीन फटाक्यांसारखे पर्यावरणपूरक बदलही स्वीकारले आहेत. हेच कारण आहे की, 'महाराष्ट्राचं शिवकाशी' ठरलेल्या तेरखेडा गावातील हा छोटासा उद्योग आज देशभरात पर्यावरणाचे रक्षण करत, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे आणि देशाला एका सुरक्षित व आरोग्यदायी दिवाळीकडे घेऊन जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com