जाहिरात

Diwali Cleaning : दिवाळीची साफसफाई करताना घरात सापडला मोठा खजिना, कुटुंब RBI कडे जाण्याच्या तयारीत?

दिवाळीच्या साफ-सफाईदरम्यान एका कुटुंबाला मोठा खजिना सापडला आहे. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Diwali Cleaning : दिवाळीची साफसफाई करताना घरात सापडला मोठा खजिना, कुटुंब RBI कडे जाण्याच्या तयारीत?

Diwali Cleaning Surprise Viral Post: दिवाळीला एवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे घराघरांमध्ये साफ-सफाई सुरू आहे. माळ्यावरील जुन्या-पुरान्या वस्तू काढल्या जात आहेत. अनेक नको असलेल्या वस्तू फेकून दिल्या जात आहेत. मात्र यंदा या साफ-सफाईदरम्यान एका कुटुंबाला मोठा खजिना सापडला आहे. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Reddit वर एका युजरने याबाबत आपला अनुभव शेअर केला आहे. त्याची आई दिवाळीनिमित्त घराची साफ-सफाई करीत होती. यावेळी डीटीएच सेट-टॉप बॉक्सवर स्वच्छ करीत होती. त्यावेळी त्या बॉक्समध्ये असं काही सापडलं की त्यांना धक्काच बसला. सेटअप बॉक्समध्ये दोन लाख रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. 

नक्की वाचा - Diwali 2025: दिवाळीत लाडू, चकली, करंजीचा फराळ का करावा? आरोग्यशास्त्रात दडलंय उत्तर, वैद्यांनी दिलेली माहिती वाचा

जुन्या डीटीएच बॉक्समधून निघाले 2 हजारांच्या जुन्या नोटा

रेडिट युजरने पोस्टमध्ये लिहिलंय, 2025 मधील सर्वात मोठं दिवाळी गिफ्ट. दिवाळीच्या साफ-सफाईदरम्यान माझ्या आईला जुन्या डीटीएच बॉक्समध्ये दोन लाखांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा सापडल्या. माझ्या वडिलांनी  या दोन हजार रुपयांच्या नोटा डीटीएच बॉक्समध्ये ठेवल्या होत्या. आम्ही अद्याप त्यांना सांगितलेलं नाही. आता पुढे काय करायचं याचा विचार करतोय. 

Latest and Breaking News on NDTV

त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. अनेकांनी त्यांना या नोटा आरबीआयच्या ऑफिसमध्ये जाऊन बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे. एकावेळेस 20 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता. तर दुसऱ्या एकाने लिहिलंय, एकत्रितपणे दोन लाख घेऊन जाऊ नका. आधी थोडेच पैसे घेऊ घ्या, अन्यथा जास्त चौकशी होईल. 2016 च्या नोव्हेंबरमध्ये नोटाबंदी झाली होती. यावेळी आरबीआयने 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर केल्या होत्या. त्यानंतर 2023 पासून 2 हजार रुपयांची नोट चलनात आली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com