जाहिरात

Monsoon Session 2025: विधानभवनातील एन्ट्रीसाठी पासेसचा रेट किती? आमदारांचा खळबळजनक खुलासा

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: सध्या याठिकाणी पासचा रेट 5 हजार रुपये 10 हजार रुपये रेट सुरू आहे," असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी केला.

Monsoon Session 2025: विधानभवनातील एन्ट्रीसाठी पासेसचा रेट किती? आमदारांचा खळबळजनक खुलासा

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात जोरदार राडा झाला. या राड्याचे आजच्या अधिवेशनात जोरदार पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनात कोणालाही प्रवेश दिला जातो, गुंडांना घेऊन नेते येतात असा आरोप करत विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी काही नेत्यांनी विधानभवनात प्रवेश पाससाठी किती पैसे घेतले जातात? याबाबत मोठा खुलासा केला.

Awhad Vs Padalkar: विधीमंडळातील राड्याचे सभागृहात पडसाद, विधानसभा अध्यक्षांनी दिला मोठा आदेश!

शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप

"नेत्यांचे कार्यकर्ते आता विधीमंडळ सभागृहात येणे आता बाकी राहिलं आहे. फार मोठी गर्दी सतत पाहिला मिळत आहे. एक महिला सदय सना मलिक स्वत म्हणाल्या एवढ्या गर्दीतून वाट काढणे अवघड होऊन जात आहे. सध्या याठिकाणी पासचा रेट 5 हजार रुपये 10 हजार रुपये रेट सुरू आहे," असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंनी केला.

"सभापतींनी निर्देश दिले होते गेटपास बंद करा मग तरीही पास कुणी सुरू केले ? सभापतींची भावना चांगली असेल मग गर्दी कशी आली? लोक येऊ द्या असं सांगणारा मंत्री कोण ? मकोकामधील आरोपी येतो, मारहाण करून जातो. काल फक्त एकावरच कारवाई झाली, मारहाण केली त्यावरही कारवाई झाली. चंद्रकांतदादांना विनंती आहे की सभागृहाची पत राखा कायदेमंडळात आमदार असुरक्षित आहेत. सर्व चर्चा दूर ठेऊन राज्यातील शिस्त संयम कायदा सुव्यवस्था यावर चर्चा ठेवा," असंही ते म्हणाले.

Rohit Pawar Viral Video: आवाज खाली! शहाणपणा करायचा नाही!! पोलीस स्टेशनमध्ये ड्रामा

अनिल परब यांचाही खळबळजनक दावा..

याबाबत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीही गंभीर आरोप केले.  "आयनॉक्स थिएटरजवळ 5 हजार आणि 10 हजार रुपये देऊन पास विकले जातात. कुणाला पैसे द्यायचे? कुठे द्यायचे?  विधान भवनच्या पहिल्या गेटवर किती द्यायचे आतल्या गेटवर किती पैसे द्यायचे? हे ठरलेले आहे. आम्ही दुपारपर्यंत तुम्हाला एफिडेव्हिटी वर नावे लिहून देतो," असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला. 

दरम्यान, 'पास देण्याचा अधिकार सभापती आणि अध्यक्षांचा असतो. शासनाचा काही संबंध नाही. आपले निर्देश सभापतींकडे आहेत . तुम्ही जो दर सांगितला तो सभापतींशी संबंधित आहे का? विरोधकांनी पुरावा द्यावा, पोलीस यंत्रणेकडून चौकशी करण्याची तयारी आहे. तुम्ही पुरावे द्या, आम्ही कारवाई करु", असं मंत्री शंभूराज देसाई म्हणाले. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com