Nagpur News: एक घर अन् 200 मतदार! महाराष्ट्रात मतदार यादीचा घोळ; विरोधक आक्रमक

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामध्ये असलेल्या वानाडोंगरी गावात एकाच घरात दोनशे मतदार दाखवण्यात आले आहेत. काय प्रकरण आहे आणि त्या मागे कोणती कारणे आहेत, जाणून घ्या

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Fake Voter List Scam News:  महाराष्ट्रात स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत..त्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा मतदार यादीत घोळ असल्याचा आरोपांना सुरुवात झाली आहे. एका छोट्याशा घरात दोनशे लोक राहू शकतात काय? हा प्रश्न आता उभा करण्यात आला आहे कारण, नव्या आलेल्या प्रारूप मतदार यादीत नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामध्ये असलेल्या वानाडोंगरी गावात एकाच घरात दोनशे मतदार दाखवण्यात आले आहेत. काय प्रकरण आहे आणि त्या मागे कोणती कारणे आहेत, जाणून घ्या

नेमकं प्रकरण काय? 

याबाबत सविस्तर माहिती  अशी की, नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात एकाच घरात तब्बल २०० मतदार आढळल्याचा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्थानीय कार्यकर्ते नवीन प्रारूप मतदार यादी दाखवत स्थानीय भाजप आमदारांवर निशाणा साधत राजकीय दबावामुळे हे घडत असल्याचा आरोप करत आहेत. या आरोपांमुळे महापालिका निवडणुकांच्या आधी राजकारण चांगलेच तापले आहे. 

Thane Morcha: ठाणे म्हणजे भ्रष्टाचार, गद्दारीची राजधानी! मोर्चापूर्वी मनसेच्या नेत्याने तोफ डागली

काय आहेत आरोप?

  • एकाच पत्त्यावर अनेक मतदार असणे,
  • वॉर्डाचे रहिवासी नसलेल्या लोकांची नावे येथील मतदार यादीत असणे,
  • वेगवेगळ्या वॉर्डांच्या मतदार याद्यांत नावांची सरमिसळ असणे
  • राजकीय नेत्यांच्या आडनावांशी मिळतीजुळती आडनावे मतदार म्हणून नोंदवली जाणे.

मात्र,येथील भाजप आमदार समीर मेघे यांनी मतदार नोंदणी प्रशासकीय बाब असून घरक्रमांक नसल्यास घर क्रमांक एक असे टाकले असेल अशी शंका व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी विरोधकांचा हल्ला परतवून लावत बोगस मतदार केल्याचा आरोप लावला आहे. दुसरीकडे या सर्व प्रकरणावर, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की घर क्रमांक नसेल तर शून्य किंवा एक नंबर टाकणं ही पद्धत वापरली जाते..आणि ते मतदार खरे असतात की नाही यावर बी एल ओ व्हेरिफिकेशन करतात. मात्र, या उत्तरामुळे नागरिकांचे समाधान होत नसून बोगस मतदानाची आशंका व्यक्त करीत त्यांनी सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. 

नक्की वाचा:  सर्वात मोठी ऑफर! कपड्यांच्या खरेदीवर 'स्विफ्ट कार' जिंकण्याची संधी

Topics mentioned in this article