जाहिरात

Akya Jadhav vs Mahesh Appa Patil: सर्वात मोठी ऑफर! कपड्यांच्या खरेदीवर 'स्विफ्ट कार' जिंकण्याची संधी

Akya Jadhav Vs Aappa Patil: आक्या जाधव आणि कीर्तनकार असलेले महेश (आप्पा) पाटील यांच्यातील वाद आणि व्यावसायिक स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Akya Jadhav vs Mahesh Appa Patil: सर्वात मोठी ऑफर! कपड्यांच्या खरेदीवर 'स्विफ्ट कार' जिंकण्याची संधी

Influencer Akya Jadhav vs Mahesh Appa Patil: पुण्यातील दोन इन्फ्लुएन्सर आणि कपड्यांचे व्यापारी यांच्यात सुरु झालेल्या व्यावसायिक स्पर्धा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आक्या जाधव आणि कीर्तनकार असलेले महेश (आप्पा) पाटील यांच्यातील वाद आणि व्यावसायिक स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोघांच्याही दुकानातून दिवाळीत कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मारुती सुझुकी स्विफ्ट कार जिंकण्याची संधी आहे. दोघांनीही स्विफ्ट कार जिंकण्याची ऑफर दिली आहे, मात्र ही ऑफर आधी कुणी दिली यावरून दोघांमध्ये हा सामना सुरु झाला आहे.

अक्या जाधवच्या दुकानातील ऑफर

अक्या जाधव म्हणजेच आकाश जाधव याचा 'रायबा फॉर मेन्स' हा कपड्यांचा ब्रँड आहे. या ब्रँडच्या राज्यभर जवळपास 32 शाखा आहे. यातील कुठल्याही शाखेत कितीही रुपयांच्या कपड्यांची खरेदी केल्यास ग्राहकांना एक व्हावचर मिळणार आहे. यात अनेक बक्षिसं जिंकण्याची ग्राहकांना संधी आहे. मात्र पहिल्या क्रमांकांच बक्षिस म्हणजेच स्विफ्ट कार प्रमुख आकर्षण ठरत आहे.

कापड क्षेत्रातील भारतातील आजपर्यंतची सर्वात मोठी ऑफर रायबा फॉर मेन्ससोबत, असा दावा आकाश जाधवने केला आहे. आकाश जाधवने नुसती कागदावर ही ऑफर ठेवली नाहीतर, नवीकोरी लाल रंगाची स्विफ्ट कार खरेदी करून आणली देखील आहे. ग्राहकांची कपडे खरेदीशिवाय ही कार पाहण्यासाठीही मोठी गर्दी होत आहेत. 10 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान ही ऑफर लागू असणार आहे.

आप्पा पाटीलच्या दुकानातील ऑफर

दुसरीकडे कीर्तककार असेलल्या महेश मटके पाटील याचं 'कसं, आप्पा म्हणल तसं' अशा नावाचं आळंदीत कपड्यांचं दुकान आहे. महेश पाटील याच्या दुकानातही 2100 रुपयांच्या पुढे खरेदी करणाऱ्या ग्राहकाला स्विफ्ट कार खरेदी करण्याची संधी आहे.

महेश पाटील यानेही कापड श्रेत्रात महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही ऑफर असल्याचा दावा केला आहे. 2100 रुपयांची खरेदी करा व मिळवा स्वीफ्ट जिंकण्याची 100% संधी. पहिलं बक्षीस स्विफ्ट कार, दुसरं बक्षीस टीव्ही आणि तिसरं बक्षिस मोबाईल अशी ही ऑफर आहे.

गाडी खरंच मिळणार का?

दोघांनीही दिलेली ऑफर कदाचित कापड क्षेत्रातील आजवरची सर्वात मोठी असेल देखील, मात्र ज्या पद्धतीने दोघांमध्ये व्यावसायिक स्पर्धा सुरु आहे, त्यावरून दोघांचेही फॉलोअर्स एकमेकांना ट्रोल करत आहेत. मात्र ही व्यावसायिक स्पर्धा कमी आणि गल्लीतलं भांडण जास्त वाटत आहे.

खरा प्रश्न असा आहे की गाडी खरंच एखाद्या भाग्यवान ग्राहकाला मिळणार का?  कारण एवढी महागडी ग्राहकालाचा मिळणार की त्यांच्या जवळच्या व्यक्तीला मिळणार असा संशयही व्यक्त केला जात आहे. कारण मोठमोठे ब्रँड्स हिंमत करणार नाही अशी हिंमत या दोघांनी दाखवली आहे. त्यामुळे लोकांचीही विजेता कोण होणार याची उत्सुकता वाढली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com