Maharashtra Water Storage: राज्यातील धरणांमध्ये सध्या 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठा 101.77 टीएमसीने अधिक आहे. ही सकारात्मक बाब असली तरी भविष्यातील संभाव्य संकटाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यंदा 'एल-निनो'च्या प्रभावामुळे पावसाच्या अनियमिततेची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. वर्ष 2014 आणि वर्ष 2015 च्या अनुभवांतून धडा घेत राज्यावर पुन्हा एकदा पाणीटंचाईचे संकट ओढवू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच सावधगिरीचा इशारा दिला आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावे, या दृष्टीने प्रशासनाला पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आणि नागरिकांना पाण्याचा अत्यंत जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी राज्यातील सर्व धरणांतील पाणीसाठा आणि एल-निनो प्रभावामुळे संभाव्य परिणामांची माहिती दिली.
महाराष्ट्रातील धरणांमध्ये 653.63 टीएमसी पाणी
एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात वर्ष 2014 मध्ये 12 टक्के तर वर्ष 2015 मध्ये सुमारे 14 टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. 15 ऑक्टोबर 2014 रोजी 872 टीएमसी तर याच दिवशी 2015 ला 625 टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत वर्ष 2025 मध्ये 15 ऑक्टोबरला 1330.97 टीएमसी पाणीसाठा होता. 21 एप्रिल 2026 रोजी पर्यंत 653.63 टीएमसी इतक्या पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 101.77 टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे. यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट 2026 अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपायोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
त्यासोबतच एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
महसूल विभागनिहाय पाणीसाठा यंदाचा उपयुक्त पाणीसाठा
- नागपूर – 80.79 TMC
- अमरावती – 73.72 TMC
- छत्रपती संभाजीनगर –129.37 TMC
- नाशिक –101.96 TMC
- पुणे – 206.55 TMC
- कोकण – 61.24 TMC
- एकूण – 653.63 TMC
- नागपूर – 63.40 TMC
- अमरावती – 65.13 TMC
- छत्रपती संभाजीनगर – 97.09 TMC
- नाशिक – 89.28 TMC
- पुणे – 174. 04 TMC
- कोकण – 62.92 TMC
- एकूण –551.86 TMC
महसूल विभागनिहाय धरण संख्या
- नागपूर – 387
- अमरावती – 276
- छत्रपती संभाजीनगर – 929
- नाशिक – 539
- पुणे – 724
- कोकण –173
- एकूण – 3028
राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा
- कोयना : 33.62 TMC
- जायकवाडी : 42.03 TMC
- उजनी : 13.39 TMC
- पेंच प्रकल्प समूह :26.57 TMC
- इसापूर : 21.45 TMC
- भातसा : 15.70 TMC
- गोसीखुर्द : 14.31 TMC
- खडकवासला धरण समूह :11.32 TMC
- मुळा : 9.54 TMC
- अप्पर वर्धा : 10.21 TMC
- अप्पर वैतरणा : 6.52 TMC
- भंडारदरा : 5.25 TMC
Photo Credit: NDTV Marathi
(नक्की वाचा: Maharashtra Weather: महाराष्ट्रावर दुहेरी संकट! पुढील 4 दिवस धोक्याचे; हवामान विभागाचा मोठा इशारा)
राज्यातील प्रमुख धरणांतील गतवर्षीचा पाणीसाठा
- कोयना :36.76 TMC
- जायकवाडी :34.44 TMC
- उजनी : 0 TMC
- पेंच प्रकल्प समूह : 26.35 TMC
- इसापूर : 17.82 TMC
- भातसा : 14.91 TMC
- गोसीखुर्द :5.93 TMC
- खडकवासला धरण समूह :9.82 TMC
- मुळा : 10.53 TMC
- अप्पर वर्धा :9. 53 TMC
- अप्पर वैतरणा : 5.95 TMC
- भंडारदरा : 6.04 TMC