Weather Update: थंडी गायब, पावसाची एन्ट्री! अवकाळी पूर्व विदर्भाला झोडपणार; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Update: पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला असून येथे आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Weather Update:  फेब्रवारी महिना संपत आला असून उन्हाचा चटका चांगलाच वाढताना दिसत आहे. एकीकडे उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा निघत असतानाच आता अवकाळीचाही फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल झाले असून आज राज्यात अनेक जिल्हांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

वातावरण फिरलं, पाऊस कोसळणार..

राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत असून, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला असून येथे विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.

Kalyan News: मनसेचे 'ते' आंदोलन, 2 महिने झाले तरी अहवाल नाही, आता उपासमारीची वेळ, प्रकरण काय?

​गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात वाढ नोंदवली जात असतानाच, हवेतील आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहून उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये इशारा? 

वाढत्या उष्णतेसोबतच येणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतीकामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. फेब्रुवारी महिना संपत असतानाच महाराष्ट्रातील हवामानात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी राज्याच्या विविध भागांत हवामानाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतील.

Advertisement

Budget session 2026: विरोधक सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार? 'या' 3 मुद्द्यांवर सरकारची कोंडी होणार

एकीकडे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उन्हाचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : गडचिरोली, चंद्रपूर

विजांसह पावसाची शक्यता : नांदेड, हिंगोली. सोलापूर, धाराशिव, लातूर,