Maharashtra Rain: राज्यात अवकाळीचा दणका, पिकांना फटका! कुठे कुठे सरी कोसळल्या?

मंगळवारी दुपारच्या सुमारास महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात झालेल्या तुफान पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल तपासे, सातारा:

Maharshtra Weather Update Update: सह्याद्रीच्या कुशीतल्या महाबळेश्वरमध्ये आज तुफान पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हा अचानक पाऊस महाबळेश्वरसह परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरणार आहे. महाबळेश्वर हे देशातील स्ट्रॉबेरी उत्पादनाचं प्रमुख केंद्र आहे. आणि सध्या स्ट्रॉबेरी काढणीचा महत्त्वाचा कालावधी सुरू आहे. अशातच पावसाने हजेरी लावल्याने त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

पावसाच्या एन्ट्रीने शेतकऱ्यांचे स्टेशन वाढवले

 राज्यातील हवामानात गेल्या २४ तासांत कमालीची स्थित्यंतरे पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्र आणि दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, याचा सर्वाधिक फटका सह्याद्रीच्या पट्ट्यातील महाबळेश्वरला बसला आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात झालेल्या तुफान पावसामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Mumbai MHADA 2026: मुंबईत घ्या स्वप्नातलं घर! मार्चमध्ये म्हाडाकडून 3000 घरांची लॉटरी; लोकेशन काय?

स्ट्रॉबेरीला मोठा फटका

हवामान तज्ज्ञांच्या मते, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये ढगांची निर्मिती वेगाने झाल्याने हा पाऊस झाला आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी काढणीचा हंगाम ऐन भरात आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे तयार फळांवर डाग पडणे, फळे कुजणे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. स्ट्रॉबेरी हे अत्यंत नाजूक पीक असल्याने पावसाचा एक शिडकावादेखील पिकाची प्रत खराब करतो.  यामुळे बाजारपेठेत मिळणाऱ्या दरात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. एकीकडे पर्यटकांसाठी थंडी आणि पावसाचा अनुभव रोमांचक वाटत असला,तरी दुसरीकडे हा पाऊस स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवणारा ठरत आहे. 

रायगड, नंदुरबारमध्ये सरी कोसळल्या

दरम्यान, आज रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पेणच्या जोहे हमरापूर भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.  अचानक आलेल्या पावसाने पेण मधील वीटभट्ट्या, गणपती कारखाने यांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच  नंदुरबार जिल्ह्यालाही अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.  नंदुरबारमध्ये पावसाने हजेरी लावल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. शहाद्यासह सर्वत्र झालेल्या पावसामुळे गहू, पपई आणि आंब्याच्या मोहराचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

VIDEO: तिरंग्याला सलामी दिली अन् अचानक कोसळले, पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; 7 सेकंदाचा हृदय पिळवटणारा क्षण