जाहिरात

Mumbai MHADA 2026: मुंबईत घ्या स्वप्नातलं घर! मार्चमध्ये म्हाडाकडून 3000 घरांची लॉटरी; लोकेशन काय?

म्हाडाकडून घरांच्या सोडत प्रक्रियेला वेग आला आहे. याबाबतच महत्त्वाची अपडेट समोर आली असून म्हाडाकडून 3,000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरु केली आहे. 

Mumbai MHADA 2026: मुंबईत घ्या स्वप्नातलं घर! मार्चमध्ये म्हाडाकडून 3000 घरांची लॉटरी; लोकेशन काय?

 विशाल पाटील, मुंबई: 

Mumbai MHADA Lottery:  मुंबईत स्वत:चं स्वप्नातलं घर असावं.. अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईत स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी आता एक अत्यंत महत्त्वाची अन् आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईमधील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी अन् आचारसंहिता संपल्यानंतर आता म्हाडाकडून घरांच्या सोडत प्रक्रियेला वेग आला आहे. याबाबतच महत्त्वाची अपडेट समोर आली असून म्हाडाकडून 3,000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरु केली आहे. 

मुंबई म्हाडाकडून 3000 घरांची लॉटरी...

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर, म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे ३,००० घरांच्या सोडतीची प्रक्रिया वेगवान केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ मध्ये ही बहुप्रतीक्षित लॉटरी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. ​केवळ मुंबईच नव्हे, तर कोकण मंडळानेही ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरातील सुमारे ४,००० घरांची सोडत काढण्याची तयारी पूर्ण केली आहे. 

Mumbai Local : लोकलमधील गर्दी कशी कमी होणार? काय आहेत पर्याय? आलोकच्या हत्येने गंभीर मुद्दा चर्चेत

म्हणजेच, येत्या उन्हाळ्यात मुंबई आणि आसपासच्या परिसरात एकूण ७,००० परवडणारी घरे उपलब्ध होतील. गेल्या काही वर्षांत म्हाडाने आपल्या धोरणात मोठे बदल केले असून, केवळ घरे बांधण्यापेक्षा त्या ठिकाणी रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे. आता या 3000 घरांच्या लॉटरीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत घरे..

दरम्यान, ​मुंबई मंडळाच्या सोडतीत प्रामुख्याने बी.डी.डी. चाळ पुनर्विकास, पत्राचाळ आणि मोतीलाल नगर यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमधील घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या ७६ वर्षांच्या प्रवासात आतापर्यंत ९ लाख घरांची निर्मिती झाली असून, मार्चची ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत ही घरे मिळत असल्याने दरवर्षी अर्जांचा पाऊस पडतो, यावर्षीही तोच कल राहण्याचा अंदाज आहे.

नक्की वाचा - कल्याण रेल्वे स्थानकात क्षणात जीव गेला असता, पण तो प्रवासी अखेर वाचला..पोलिसाचा प्रजासत्ताक दिनी होणार सत्कार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com