जाहिरात

VIDEO: तिरंग्याला सलामी दिली अन् अचानक कोसळले, पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; 7 सेकंदाचा हृदय पिळवटणारा क्षण

Police Officer Mohan Jadhav Heart Attack Video: सोलापूर- हैद्राबाद महामार्गावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर ध्वजवंदन सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली. 

VIDEO: तिरंग्याला सलामी दिली अन् अचानक कोसळले, पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; 7 सेकंदाचा हृदय पिळवटणारा क्षण

ओंकार कुलकर्णी, धाराशिव:

Dharashiv Police Officer Heart Attack Death Video: देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. लोकशाहीच्या या उत्सवात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण सहभागी झाले होते. एकीकडे अवघा देश तिरंगी रंगात रंगला असतानाच धाराशिवमध्ये एक काळीज पिळवटणारी घटना घडली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हृदयविकाराच्या धक्क्याने दारूबंदी अधिकाऱ्याच निधन झाल्याची दुर्दैवी घटना उमरग्यात घडली. या मन सुन्न करणाऱ्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Buldhana News: झेंडावंदन करताना अनर्थ घडला! मुख्याध्यापकाच्या मृत्यूने गावावर शोककळा; शाळेत काय घडलं?

तिरंग्याला सलामी देताच कोसळले

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहन समारंभासाठी उपस्थित असणाऱ्या दारूबंदी अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना धाराशिवच्या उमरग्यात घडली आहे. मोहन जाधव असे या दारूबंदी अधिकाऱ्याचं नाव आहे. सोलापूर- हैद्राबाद महामार्गावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर ध्वजवंदन सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली. 

ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व अधिकारी, सहकाऱ्यांचा एकत्रित फोटो काढला जात होता. फोटोसेशनसाठी सर्वजण उभे असतानाच मोहन जाधव हे चक्कर आल्याने खाली कोसळले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच डॉक्टरांनी मोहन जाधव यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ 

फोटोसेशनसाठी सर्वजण हसत हसत उभे असतानाच काळाने घात केला. तिरंग्याला सलामी दिल्यानंतर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा झालेला काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, मोहन जाधव हे अत्यंत मनमिळावू, कर्तव्यदक्ष आणि सहकाऱ्यांमध्ये आदर असलेले अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

PCMC News: पिंपरी चिंचवडमध्ये हायटेक सुरक्षा कवच! AI च्या मदतीने गुन्हेगारीवर वचक; काय आहे प्लॅन?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com