महाराष्ट्रात कोणकोणत्या झेडपी आणि पंचायत समितीसाठी मतमोजणी होतेय? पाहा संपूर्ण यादी

Maharashtra Zilla Parishad, Panchayat Samiti Election Results 2026: राज्य निवडणूक आयोगाने 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत सममित्यांच्या निवडणुकीची घोषणा 13 जानेवारी 2026 रोजी केली होती.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी  7 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. 9 फेब्रुवारी रोजी म्हणजेच सोमवारी या निडणुकांचे निकाल लागणार आहेत.  जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीसाठी  2 कोटी 8 लाख 20 हजार 702 पात्र मतदार होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत एकूण 68.28% मतदान झाले आहे. 

मतदानाची तारीख का बदलली ?

राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत सममित्यांच्या निवडणुकीची घोषणा 13 जानेवारी 2026 रोजी केली होती. त्यावेळी 5 फेब्रुवारीला मतदानाची तारीख ठरवण्यात आली होती, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला होता. यामुळे मतदानाची तारीख बदलून ती 7 फेब्रुवारी करण्यात आली होती. 

किती उमेदवारांचे भवितव्य पणाला ?

सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागा असून, त्यातील 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार 624 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.  125 पंचायत समित्यांमध्ये मिळून एकूण 1 हजार 462 जागा आहेत, त्यातील 731 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण 4 हजार 814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

राज्यामध्ये कोणकोणत्या पंचायत समित्यांची निवडणूक झाली? पाहा संपूर्ण यादी

रायगड

पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर 

रत्नागिरी

मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर 

सिंधुदुर्ग

वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी दोडामार्ग 

पुणे

जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, वेल्हे, भोर, बारामती, इंदापूर 

सातारा

खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, जावळी, सातारा, पाटण, कराड 

सांगली

आटपाडी, जत, खानापूर (विटा), कडेगाव, तासगाव, कवठे महांकाळ, पलुस, वाळवा-ईश्वरपूर, शिराळा, मिरज 

सोलापूर

करमाळा, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट 

कोल्हापूर

शाहुवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, गडहिंग्लज, चंदगड 

छत्रपती संभाजीनगर

सोयगाव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण 

परभणी

जिंतूर, परभणी, मानवत, सेलू, पाथरी, सोनपेठ, पूर्णा, पालम, गंगाखेड 

धाराशीव

परांडा, भूम, वाशी, कळंब, धाराशीव, तुळजापूर, लोहारा, उमरगा 

लातूर

अहमदपूर, जळकोट, उदगीर, चाकूर, रेणापूर, लातूर, शिरूर (अनंतपाळ), देवणी, औसा, निलंगा

कोणत्या जिल्हा परिषदांसाठी झाली? पाहा संपूर्ण यादी

  1. रायगड, 
  2. रत्नागिरी,
  3. सिंधुदुर्ग, 
  4. पुणे, 
  5. सातारा, 
  6. सांगली, 
  7. सोलापूर, 
  8. कोल्हापूर, 
  9. छत्रपती संभाजीनगर, 
  10. परभणी, 
  11. धाराशीव, 
  12. लातूर
Topics mentioned in this article