महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजप किती जागा लढणार? शिवसेना आणि राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर बातमी

महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा नसेल असे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्ष आपापल्या वाट्याला आलेल्या जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करतील. 

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे

दसरा होऊन गेला तरी अद्याप ना महायुतीने जागावाटप जाहीर केलंय ना महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर केलं आहे. मंगळवारी महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद असून त्यामध्ये जागावाटप जाहीर केलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वीच NDTV ला खास सूत्रांनी जागावाटपाची इनसाईड इन्फॉर्मेशन दिली आहे. महायुतीमध्ये 90 टक्के जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे. उरलेल्या 10 टक्के जागांचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना मुख्यमंत्रीपदाचा कोणताही चेहरा नसेल असे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे महायुतीतील तीनही पक्ष आपापल्या वाट्याला आलेल्या जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करतील. 

नक्की वाचा: भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत मोठा निर्णय

हिरामण खोसकर यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

एकीकडे जागावाटपाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला धक्का दिला.  इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार हिरामण भिका खोसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हिरामण भिका खोसकर यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतनाना  सकाळे यांच्यासह डझनभर समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.  खोसकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे नाशिक व परिसरात पक्ष मजबूत होईल, असे सांगून अजित पवार यांनी यावेळी त्यांचे   स्वागत केले. खोसकर यांचा नाशिक विभागात विशेषत: आदिवासी समाजात मोठा दबदबा असल्याचा दावा केला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला हा दुसरा मोठा प्रवेश आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मुंबईत पक्षात प्रवेश केला होता.

Advertisement

नक्की वाचा : 'लाडक्या मित्रा असं व्हायला नको होते!', अतुल परचुरेंच्या निधनानंतर सारेच हळहळले

कसं असेल संभाव्य जागावाटप

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्ये भाजपचे 105 आमदार निवडून आले होते. त्याखालोखाल जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने 54 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसला 44 जागांवर यश मिळालं होतं. 13 आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप 158 जागा लढणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. भाजपखालोखाल सर्वाधिक जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता असून शिवसेनेला 70 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. 
  

Advertisement