(Pandharpur Wari 2025 ) आषाढी वारीचे निमित्ताने यंदा विठ्ठल मंदिर (Pandharpur Vitthal Temple) परिसरातील वाहतुक मार्गात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रथमच विठ्ठल मंदिर परिसरात थेट जाणारा रस्ता हा वनवे करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलाय. त्यामुळे वारकरी भक्तांना कुठल्याही अडथळ्याशिवाय मंदिर परिसरात वावरणे सहज शक्य होणार आहे. (Traffic routes changes in Pandharpur Vitthal Temple area)
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गर्दीच्या वेळी चेंगरा चेंगरी सारख्या परिस्थितीतही कुठल्याही प्रकारची आपत्ती येऊ नये, यासाठी वनवेचा पर्याय मंदिर परिसरात आषाढीच्या निमित्ताने महत्त्वाचा मानला जातोय. आषाढी एकादशीला लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात ( Ashadhi Wari Update) दाखल होतात. वाढणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनात अडथळा येऊ नये यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
नक्की वाचा - Ashadhi Wari 2025: 1 टन पिठलं, 1 लाख भाकऱ्या! वारकऱ्यांसाठी यवतकराची मेजवानी, काय आहे अनेक वर्षांची परंपरा?
मंदिर परिसर वनवे होत असल्याने वारकरी भक्तांना चंद्रभागा स्नान झाल्यानंतर आता थेट चौफाळा येथून प्रदक्षिणा मार्गावर किंवा शहरा बाहेर गर्दीचा सामना न करता सहज पडता येणार आहे. मंदिराकडे जाण्यासाठी पर्यायी दोन रस्ते उपलब्ध करून दिले आहे
पालख्या पुण्यात मुक्कामी असताना सफाईदूत ऑन ड्युटी
पुणे शहरामध्ये यंदाही पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला केला. पुणे शहरामध्ये अस्वच्छता निर्माण होणार नाही याकरिता 16 ठिकाणी कंटेनर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी मुक्कामी असणाऱ्या दिवशी परिसरात कोणत्याही अस्वच्छता राहणार नाही याकरिता भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य विभागातील सेवाकांमार्फात तीन सत्रात रस्ते झाडणकाम व कचरा पडल्यास त्वरित कचरा उठाव, औषध फवारणी करणेत आले.
पुणे शहरामधून संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी प्रस्थान केल्यानंतर, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावरील सर्व ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील सेवाकांमार्फात एकूण ओला 16 टन 252 किलो आणि सुका 98 टन 93 किलो असा मिळून 114 टन 345 किलो कचरा वर्गीकृत करून उठाव करण्यात आला.