Nylon Manja Ban Nagpur: मकर संक्रातीचा सण अवघ्या एका दिवसावर आला असून पतंग उडवण्याचा हंगाम आता सुरु झाला आहे. पतंगबाजी करताना नायलॉन मांजा वापरल्याने पक्षी तसेच नागरिकांच्या जिवीतास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर जीवघेणा नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यास थेट २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतला आहे.
नायलॉन मांजावर बंदी, 25 हजारांचा दंड
समोर आलेल्या माहितीनुसार, पतंग उडवताना नायलॉन मांजा वापरल्यास थेट २५ हजार रुपयांचा दंड देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतला आहे. अल्पवयीन मुलाकडे मांजा आढळल्यास पालकांना दंड होणार आहे तर वयस्क व्यक्तीकडे मांजा आढळल्यास त्यालाच दंड भरावा लागणार आहे. सुरुवातीला ५० हजारांचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता मात्र पालकांच्या विनंतीनंतर २५ हजार दंड निश्चित करण्यात आला आहे.
KDMC Election 2026: पैसे वाटपावरुन तुफान राडा! शिंदे गट- भाजप कार्यकर्ते भिडले; 2 जण जखमी
विक्रेत्यांवरील दंडाची रक्कम कायम दंड प्रत्येकवेळी स्वतंत्रपणे भरावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा नियम केवळ संक्रांतीपुरता नाही, वर्षभर लागू राहणार आहे. दंडाची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष खात्यात जमा होणार असून महापालिका आणि पोलिसांवर दंड वसुलीची जबाबदारी असेल. क्यूआर कोडच्या माध्यमातून ही दंड वसुली होणार असून तात्काळ दंड न भरल्यास १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. तसेच पालकांनी मुलांना नायलॉन मांजाच्या धोक्याबाबत समज द्यावी असे आवाहन न्यायालयाने केले आहे. पुढील सुनावणी २० जानेवारी रोजी होणार आहे.
विक्रेत्यांनाही दणका..
दुसरीकडे, नाशिकमध्ये याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नायलॉन मांजाच्या विक्री, साठवणूक व वापरावर उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. आदेशानुसार, विक्रेत्यांना 2.5 लाख रुपये दंड व वापरकर्त्यांना 25 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. अल्पवयीन मुलांकडून नायलॉन मांजा वापर झाल्यास पालकांवरही कारवाई होईल. नागरिकांनी सुरक्षित मांजाच वापरावा, असे आवाहन वर्ध्याच्या पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.