जाहिरात

Local Megablock: मुंबईकरांनी लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; 288 लोकल रद्द, मेल- एक्सप्रेसवरही परिणाम

Westerrn Railway Megablock News: या ब्लॉकमुळे २८८ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉकचा मेल तसेच एक्सप्रेस गाड्यांवरही मोठा परिणाम होणार आहे. 

Local Megablock: मुंबईकरांनी लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; 288 लोकल रद्द, मेल- एक्सप्रेसवरही परिणाम

Westerrn Railway Megablock: मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.  पश्चिम रेल्वे महामार्गावरील कांदिवली - बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी मंगळवारी आणि बुधवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे २८८ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉकचा मेल तसेच एक्सप्रेस गाड्यांवरही मोठा परिणाम होणार आहे. 

पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

​पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली ते बोरीवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी येत्या १४ आणि १५ जानेवारी २०२६ रोजी तब्बल २८८ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे ऐन कामाच्या दिवशी उपनगरीय प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. २१ डिसेंबर २०२५ पासून सुरू असलेला हा ३० दिवसांचा विशेष मेगाब्लॉक आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १४ जानेवारी रोजी १४४ आणि १५ जानेवारी रोजी १४४ अशा एकूण २८८ फेऱ्या रद्द राहतील.

कांदिवली आणि मालाड स्थानकांदरम्यान रेल्वेचे पॉईंट्स काढणे आणि तांत्रिक जोडणी करणे हे या ब्लॉकचे मुख्य उद्दिष्ट आहे. १३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासूनच या कामाला सुरुवात होणार असून, अप आणि डाऊन दोन्ही जलद मार्गांवर ठराविक कालावधीसाठी रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाईल.​केवळ लोकलच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही या ब्लॉकचा फटका बसला आहे.

KDMC Election 2026: पैसे वाटपावरुन तुफान राडा! शिंदे गट- भाजप कार्यकर्ते भिडले; 2 जण जखमी

अहमदाबाद-बोरीवली आणि नंदुरबार-बोरीवली या एक्स्प्रेस गाड्या वसई रोडपर्यंतच चालवण्यात येतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ नियोजन करण्याचे आवाहन केले असले तरी, सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होणार हे स्पष्ट आहे. सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर पश्चिम रेल्वेची क्षमता वाढणार असली, तरी सध्या मुंबईकरांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहिली जात आहे.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

गाडी क्रमांक १९४२६ नंदुरबार – बोरीवली एक्सप्रेसचा १३ आणि १४ जानेवारी २०२६ रोजी सुरू होणारा प्रवास वसई रोड येथे थांबवला जाईल.

गाडी क्रमांक १९४१८ अहमदाबाद – बोरीवली एक्सप्रेस १३ आणि १४ जानेवारी २०२६ रोजी सुरू होणारा प्रवास)वसई रोड येथे थांबवला जाईल.

गाडी क्रमांक १९४२५ बोरीवली – नंदुरबार एक्सप्रेस (१४ आणि १५ जानेवारी २०२६ रोजी सुरू होणारा प्रवास) वसई रोड येथून सुरू होईल.

गाडी क्रमांक १९४१७ बोरीवली – अहमदाबाद एक्सप्रेस (१४ आणि १५ जानेवारी २०२६ रोजी सुरू होणारा प्रवास) वसई रोड येथून सुरू होईल.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला दणका! निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय, आता लाडक्या बहिणींना...

Listen to the latest songs, only on JioSaavn.com