Malegaon Sugar Factory Election Result Update: बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. 24 जून सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मतमोजणी दुसऱ्या दिवशीही सुरु असून आज त्याचा निकाल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री अजित पवारांनीही उमेदवारी दाखल केल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलला चंद्रराव तावरे यांच्या शेतकरी पॅनेलने कडवे आव्हान दिलं आहे. कालपर्यंतच्या मतमोजणीनुसार अजित पवार यांच्या पॅनेलने विजयाकडे वाटचाल सुरु केल्याचे दिसत आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू आहे अद्याप देखील ही मतमोजणी सुरूच आहे. आता तब्बल या मतमोजणीला 22 तास ओलांडले आहेत. विशेष म्हणजे पहिली फेरीचे मतमोजणीची प्रक्रिया ही जवळपास पहाटे चार ते साडेचार च्या सुमारास संपली.
आतापर्यंत केवळ एकच निकाल घोषित झाला असून त्यामध्ये ब वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरी अखेर बऱ्यापैकी अजित पवार गटाची म्हणजे श्रीनिळकंठेश्वर पॅनलची आघाडी दिसून येत असून एकूण वीस उमेदवारांपैकी 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर आहेत.
पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल:
अनुसूचित जाती जमाती
पिछाडी _बापूराव आप्पाजी गायकवाड गायकवाड. 3717 ( तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल )
आघाडी _रतनकुमार साहेबराव भोसले 4117 ( अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )
इतर मागासवर्ग
पिछाडी_ रामचंद्र कोंडीबा नाळे 3644 ( तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल )
आघाडी _नितीन वामनराव शेंडे 4120( अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )
विमुक्त जाती NT
आघाडी_ विलास ऋषिकांत देवकाते 4269 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )
पिछाडी _ सूर्याजी तात्यासो देवकाते 3288 ( तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल )
महिला राखीव मतदारसंघ
आघाडी _ राजश्री बापूराव कोकरे 3835 (तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनल )
आघाडी _ संगीता बाळासाहेब कोकरे 4021(अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )
पिछाडी _ ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले 3568 (अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनल )
ब वर्ग
अजित पवार: 91 (विजयी)
भालचंद्र देवकाते: 10
माळेगाव ऊस उत्पादक गट क्रमांक 1
आघाडी_ रणजीत जाधवराव 4332 (अजित पवार गट)
आघाडी_ बाळासाहेब तावरे 3803 (अजित पवार गट)
पिछाडी_ संग्राम काटे 3425 (तावरे गट)
पिछाडी_ रमेश गोफने. 2963 (तावरे गट)
पिछाडी_ रंजनकाका. 3587 (तावरे गट)
आघाडी_ राजेंद्र बुरुंगले 3760 (अजित पवार गट)
पणदरे गट क्रमांक 2
आघाडी_ तानाजी कोकरे 3808 (अजित पवार गट)
आघाडी _ योगेश जगताप 4110 (अजित पवार गट)
आघाडी_ स्वप्नील जगताप 3796 ( अजित पवार गट)
पिछाडी_ रोहन कोकरे 3314 (तावरे गट)
पिछाडी_ रणजित जगताप 3050 (तावरे गट)
पिछाडी_ सत्यजित जगताप 3247 (तावरे गट)
सांगवी गट क्रमांक 3
आघाडी_ चंद्रराव तावरे 4041(तावरे गट)
आघाडी_ गणपत खलाटे 4115 (अजित पवार गट)
आघाडी _ रणजित खलाटे 3747 (तावरे गट)
पिछाडी_ विजय तावरे 3645 (अजित पवार गट)
पिछाडी_ विरेंद्र तावरे 3332 (अजित पवार गट)
खांडज शिरवली गट क्रमांक 4
आघाडी_ प्रताप आटोळे 3995 (अजित पवार गट)
आघाडी_ सतीश फाळके 4117 (अजित पवार गट)
पिछाडी_ विलास सस्ते 3258 (तावरे गट)
पिछाडी_ पोंदकुले मेघश्याम 3145 (तावरे गट)
निरावागज गट क्रमांक पाच
आघाडी_ अविनाश देवकाते 4289 (अजित पवार गट)
आघाडी_ जयपाल देवकाते 3862 (अजित पवार गट)
पिछाडी_ केशव देवकाते 3179 (तावरे गट)
पिछाडी_ राजेश देवकाते 3254 (तावरे गट)
बारामती गट क्रमांक सहा
पिछाडी_ नितीन सातव 3559 (अजित पवार गट)
आघाडी_ नेताजी गवारे 3740 (तावरे गट)
आघाडी_ देविदास गावडे 3898 (अजित पवार गट)
पिछाडी_ गुलाबराव गावडे 3542 (तावरे गट)