सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावातील मतदानाचा वाद अजूनही कायम आहे. माळशिरस मतदासंघात मारकडवाडीचा समावेश होतो. या गावात आपल्याला अपेक्षित मतदान झालंच नाही, असा दावा तेथील आमदार उत्तम जाणकर यांनी केलंय. 'माझं मत कुठे गेलं हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे', असं सांगत त्यांनी मारकडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. प्रशासनानं परवानगी नाकारल्यानं त्यांची मागणी पूर्ण झाली नाही. आता त्यानंतर जानकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजीनामा देण्यास तयार
माझं मत कुठे गेलं हे जाणून घेण्याचा मला अधिकार आहे. मी या प्रकरणात निवडणूक आयोगाकडं जाणार आहे. निवडणूक आयोग तसंच सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. लोक म्हणतात आम्ही जानकरांना मतदान केलं, मग मत कुठे गेलं? तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक घेता, गडचिरोलीला निवडणूक घेता मग बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात हरकत काय? मी राजीनामा द्यायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडीला यावं असं आव्हान जानकर यांनी दिलं.
माझा मतदारसंघ ट्रायलसाठी द्यायला तय्यार आहे. वकिलांसोबत चर्चा सुरु आहे. माझा राजीनामा निवडणूक आयोगाला देणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : 'योग्य वेळी योग्य निर्णय...', जयंत पाटलांचे सूचक संकेत; राजकीय भूकंप होणार? )
जयंत पाटील यांनी दिला सबुरीचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (8 डिसेंबर) मारकडवाडीला भेट दिली. त्यावेळी झालेल्या सभेत जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर त्यांना जयंत पाटील यांनी सबुरीचा सल्ला दिला होता.
म्ही राजीनामा दिलाय तर पोटनिवडणुकीत तुम्हीच जिंकाल यात वाद नाही. त्याबाबत पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर आधी सरकारने जाहीर करावं की आम्ही बॅलेट पेपरवर निवडणूक घेवू. सरकारने तसं जाहीर केलं तर नक्की राजीनामा द्या. विजय हा तुमचाच आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.