जाहिरात

मुलाची हत्या केली अन् आत्महत्येचा बनाव रचला, बिंग फुटल्यानंतर माय-लेकींना अटक

Sangli News : मयूर त्याचा आई व बहिणीशी सतत वाद होत होता. हे वाद अनेकदा विकोपाला गेले होते. मयूरच्या त्रासाला संगीता आणि काजल वैतागल्या होत्या.

मुलाची हत्या केली अन् आत्महत्येचा बनाव रचला, बिंग फुटल्यानंतर माय-लेकींना अटक

शरद सातपुते, सांगली

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील कासार गल्लीत राहणाऱ्या मयूर  माळी (वय 30 वर्ष) या तरुणाची आई व बहिणीने डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. यानंतर मयूर याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याचा बनाव आई व बहिणीने केला. मात्र पोलीस तपासात माय-लेकीच्या गुन्ह्यांचं बिंग फुटलं. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विनय गोडसे यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आई संगीता रामचंद्र माळी व बहीण काजल रामचंद्र माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मयूर त्याचा आई व बहिणीशी सतत वाद होत होता. हे वाद अनेकदा विकोपाला गेले होते. मयूरच्या त्रासाला संगीता आणि काजल वैतागल्या होत्या. त्यातूनच त्या मयूरला धडा शिकवण्याची संधी शोधत होत्या. मयूरच्या हत्येच्या आदल्या दिवशीच्या रात्री त्यांच्यात जोरदार वाद झाला होता. यातून मयूरचा काटा काढण्याचे ठरवून  रात्री नऊ वाजता दोघींनी मयूरला जेवणातून गुंगीचे औषध दिले. मयूरला गुंगी आल्यानंतर काही वेळाने त्यांनी मयूरच्या डोक्यात दगड घातला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर मयूरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मयूरने पेटवून दिले व जळून मृत्यू झाल्याचा बनाव माय-लेकीने केला.

(नक्की वाचा-  Rahul Gandhi: 'त्यावेळी मी नव्हतो, पण...', शिख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठं वक्तव्य)

मयूर हा नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असायचा. दोस्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून तो शहरात विविध उपक्रम राबवत होता. त्यामुळे तो तरुणांच्यात मिळून मिसळून असायचा. शनिवारी दिवसभर त्याच्या मृ्त्यूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. मात्र मयूर याचा नेमका खून कोणत्या कारणाने झाला, याची माहिती उशीरापर्यंत समोर आली नव्हती. 

भाजलेल्या अवस्थेत मयूरला तासगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर डोक्यात मोठी जखम आढळून आली. यामुळे संशय बळावला आणि खुनाचा प्रकार उघडकीस आला.

(नक्की वचा-  पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं! लाखोंचा गंडा, रत्नागिरीच्या तरुणाची फसवणूक)

संगीता आणि काजल यांच्याव्यतिरिक्त या खुनात अन्य कोणाचा सहभाग आहे काय? याबाबतही शहरात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मयूर हा नेहमी आई आणि बहिणीला त्रास देत होता, अशीही माहिती समोर येत आहे. याबाबत तासगाव पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: