Manikrao Kokate : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना आज नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारची फसवणूक करत मुख्यमंत्र्यांच्या 10 टक्के कोट्यातील 4 सदनिका बळकवल्याचा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधुंवर आरोप प्रकरणात नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने त्यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यासंदर्भात त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे कोकाटेंचं राजकीय भवितव्य धोक्यात सापडलं होतं. अखेर कोकाटेंना नाशिक सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
नक्की वाचा - Abu Azmi : सपाचे आमदार अबु आझमी निलंबित, औरंगजेबाबद्दल नेमकं काय म्हणाले होते?
माणिकराव कोकाटे प्रकरण आणि आजपर्यंतचा घटनाक्रम -
- सरकारची फसवणूक करत मुख्यमंत्र्यांच्या 10 टक्के कोट्यातील 4 सदनिका बळकवल्याचा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधुंवर आरोप
- नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांच्या दंडाची सुनावली होती शिक्षा
- 1989 ते 1994 साली फसवणुक करत सदनिका बळकवल्याचा गुन्हा घडला
- 1995 साली माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- कोकाटे बंधूंवर भादवी 420, 465, 471, 47 अन्वये होता गुन्हा दाखल
- 20 फेब्रुवारी 2025 ला नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालायात अंतिम सुनावणी पार पडली आणि शिक्षा ठोठावण्यात आली
- माणिकराव कोकाटे यांची 15 हजाराच्या जातमुचलक्यावर सुटका झाली आणि 24 फेब्रुवारीला माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयात शिक्षेला आव्हान देत अपिल दाखल केले
- 24 फेब्रुवारीला दाखल अपिलात 25 फेब्रुवारीला सरकारी वकिलांनी बाजू मांडली
- 25 फेब्रुवारीला माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या मुलीने हरकत याचिका दाखल करण्याची मागणी केली कोर्टाने ती फेटाळली
- 25 फेब्रुवारीला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावणी पूर्ण केली मात्र निकाल राखून ठेवत 1 मार्च तारीख दिली
- 1 मार्चला माणिकराव कोकाटे यांच्याबाबत निकाल अपेक्षित असतांना अंजली राठोड आणि शरद शिंदे यांनी दोन हरकत याचिका दाखल करण्याची केली मागणी
- हरकत याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 5 मार्च पर्यंत देण्यात आली मुदत
- आज मुदत संपणार असल्याने सुनावणी झाली.
- माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने स्थगिती दिली