Manoj Jarange : "...तर पुन्हा छाताडावर बसणार", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange PC : कुणाचं सरकार आलं आम्हाला काही देणं-घेणं नाही. मैदानात असतो तर धुरळा वाजवला असतो. या राज्यात मराठेच बाप ठरले आहेत. मराठ्यांच्या मताशीवाय या राज्यात कुणीच सत्तेत येऊ शकत नाही, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही निवडणुकीच्या मैदानातच नव्हतो, तर जरांगे फॅक्टर फेल कसं म्हणता, असं म्हणत टीकाकारांना त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण निवडून आलं आम्हाला घेणंदेणं नव्हतं. कधी श्रेय घ्यावं हे तरी कळलं पाहिजे. जे निवडून आले ते सगळे मराठा फॅक्टरवर निवडून आले आहेत. एखाद्या आमदाराने बोलून दाखवावं मराठ्यांशिवाय निवडून आलोय. जरांगे फॅक्टर, मराठा फॅक्टर कळायला तुमची हयात जाईल, अशी टीका देखील मनोज जरांगे यांनी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरकार आलंय त्याबदद्ल त्यांना शुभेच्छा. मात्र आता मराठा आरक्षण लवकर द्यायचं, बेईमानी करायची नाही. बेईमानी केली तर खूप भोगावं लागेल. सरकारला जाहीरपणे सांगतो मराठा आरक्षण द्यायचं नसेल तर पुन्हा छाताडावर बसणार, असणार देखील इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. आरक्षण दिलं नाहीतर सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहोत. सरकार स्थापन झाल्यावर आम्ही उपोषणाची तारीख जाहीर करणार. आरक्षण न दिल्यास तुम्हाला गुडघ्यावरच टेकवणार, असं देखील मनोज जरागे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा-  Maharashtra New MLA : राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी)

एका जातीवर शक्य नव्हतो म्हणून आम्ही बाजूला झालो.  कुणाचाही सत्ता आली तरी आम्हाला संघर्ष करावच लागणार होता. विजयाने हुरळून जायचं नाही, मराठ्यांना छेडायचं काम करायचं नाही. सत्तेत आले म्हणून दादागिरी करायची हे मराठ्यांपुढे चालणार नाही. नाहीतर नसते भोग भोगावे लागतील. चांगले लोकं निवडा हे मराठ्यांना सांगितलं होतं. मी कुणाच्याही दावणीला मराठा बांधला नव्हता, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा -  शिवसेना शिंदे गटाच्या या आमदाराला मिळणार मंत्रिपदाची संधी, खासदार श्रीकांत शिंदेंचे संकेत)

मराठ्यांशिवाय राज्यात कुणाचीही सत्ता येऊ शकत नाही. आता मराठ्यांनी दिलं, तर मराठ्यांना द्या. मराठ्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं आहे. कुणाचं सरकार आलं आम्हाला काही देणं-घेणं नाही. मैदानात असतो तर धुरळा वाजवला असतो. या राज्यात मराठेच बाप ठरले आहेत. मराठ्यांच्या मताशीवाय या राज्यात कुणीच सत्तेत येऊ शकत नाही, असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

Advertisement
Topics mentioned in this article