मनोज जरांगेंचा 'लोकसभा पॅटर्न', "मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला त्यांना सोडू नका"

Manoj Jarange : निवडणुकीत ज्याला निवडून आणायचं आणि ज्याला पाडायचं पाडा हे तुम्ही गावागावात ठरवा. मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला त्यांना मात्र सोडू नका. एकजुटीने सगळे मतदान करा. यांचा कार्यक्रम केला पाहिजे. आरक्षणाला विरोध करणाऱ्याना सोडायचं नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज जरांगे यांना विधानसबा निवडणुकीत आपले उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अचानक त्यांना विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. मात्र यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता. यावर बोलतांना मनोज जरांगे यांनी म्हटलं की, आरक्षणाची लढाई जिंकायची आहे. राजकारणावरुन कोणताही संभ्रम मराठा समाजात नाही. स्वार्थासाठी दुसऱ्याच्या नरड्याचा घोट घ्यायला निघालेत, ते संभ्रम निर्माण करत आहे. "

लोकसभेप्रमाणे ज्याला निवडून आणायचं त्याला आणा आणि ज्याला पाडायचं त्याला पाडा. मराठ्यांच्या एकजुटीचा यांना स्व:ताच्या स्वार्थासाठी फायदा करुन घ्यायचा आहे. ज्यांनी तुमच्या लेकरांवर अन्याय केला, ज्यांनी तुम्हाला आरक्षणापासून दूर ठेलं त्यांना सोडू नका, असं आवाहनही मनोज जरांगे यांना मराठा समाजाला केलं. 

(नक्की वाचा - Nanded Assembly : लेक की राजकीय शिष्य? अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात कोणाचा 'जयजयकार' )

आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेले नाही. मला राजकारणापेक्षा मराठा आरक्षणाचं आंदोलन महत्त्वाचं वाटतं. विधानसभेत काय निर्णय काय घ्यावा याची जबाबदारी मी गावागावातील मराठा बांधवांवर सोपवली आहे.  गावागावातील लोकांनी उमेदवारांकडून शब्द घ्यावा. व्हिडीओ करुन घ्यावा, असंही मनोज जरांगे यांनी सांगितलं.   

निवडणुकीत ज्याला निवडून आणायचं आणि ज्याला पाडायचं पाडा हे तुम्ही गावागावात ठरवा. मराठा समाजाला ज्यांनी त्रास दिला त्यांना मात्र सोडू नका. एकजुटीने सगळे मतदान करा. यांचा कार्यक्रम केला पाहिजे. आरक्षणाला विरोध करणाऱ्याना सोडायचं नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. 

Advertisement

(नक्की वाचा - उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी)

आम्हाला केवळ आरक्षण हवं आहे. आम्ही राजकारण सोडलं. मात्र ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना सोडणार नाही. कुणाला सोडायचं नाही, हे समजण्याएवढा बुद्धीमान मराठा समाज आहे. मराठा समाज बरोबर त्यांचा कार्यक्रम करणार. कुणाचीही सत्ता येऊ द्या घाबरायची गरज नाही. एकजुटीने मतदान करा, मतं फुटू देऊ नका, असं आवाहनही मनोज जरांगे यांनी केले.

देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं की, 40 50 वर्षात झालं नाही तेवढं नुकसान 5 वर्षात केलं. मराठ्यांचा यांनी अवमान केला आहे. मराठ्यांची राख केली.आरक्षण दिल्याचा गप्पा मारतात, पण दिलं नाही. आमच्या डोळ्यासमोर दुसऱ्यांना आरक्षण दिलं.  एकच सांगतो गुर्मित राहू नका. सरकार कुणाचंही येऊ द्या, पुन्हा हा पठ्ठ्या उभा आहे. तुम्हाला मराठे गुडघ्यांवर टेकवणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांना दिली.  

Advertisement