जाहिरात

उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई, माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी
मुंबई:

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने एक पत्रक पाठवून याची माहिती दिली. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पत्रकानुसार, सुभाष वानखेडे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपची महाराष्ट्रात विशेष प्रचार मोहीम, नेमका काय आहे प्लान?

नक्की वाचा - परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपची महाराष्ट्रात विशेष प्रचार मोहीम, नेमका काय आहे प्लान?

अमरावतीच्या बडनेरा मतदार संघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खराटेविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार संजय बंड यांच्या सहचारिणी प्रीती बंड यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.. तर प्रीती बंड यांच्यासोबत असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नाना नागमोते, प्रवीण आळसपुरे, आशिष धर्माळे, मनोहर भूत या शिवसैनिकांची देखील सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com