छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार यामध्ये तिळमात्र शंका नाही असे म्हणत मी सर्व ठीक करतो. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे आरक्षणात जातील असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरुन टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला.
काय म्हणाले मनोज जरांगे?
"काहींचे पोट यासाठी दुखत आहे की त्यांच्या हातातून सगळं गेले. त्यांना आरक्षणावर राजकारणावर करायचं होते, अशीच नाटक करुन ते त्यांचे जीवन जगत होते, ते आता पूर्ण कोलमडायला आले आहे. मात्र हे लोक कधीही आपल्या बाजूने बोलले नाहीत. मी काय करतोय ते समजून घ्या. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि आनंदात राहा," असं मनोज जरांगे म्हणाले.
Manoj Jarange Protest: मराठा आंदोलनानंतर BMC कर्मचाऱ्यांची दमछाक, रातोरात साफ केला 1लाख किलो कचरा
"मराठा समाजाचे मी का वाटोळे करेन. मी आनंदी आहे आणि समाजही आनंदी आहे. आम्हाला कुणाशी घेणंदेण नाही. जर वाटत असेल की जीआरमध्ये घोळ आहे तर त्यांच्या समोर सांगितले आहे हवा तसा बदल करुन घेऊ. कोणीही कुणावर विश्वास ठेऊ नये. तुमचे वाटोळ करायचे असते तर ३ कोटी मराठ्यांना आरक्षण दिले नसते. नोकऱ्यांमध्ये संधी दिली. तुमचा आणि माझा विश्वास ढळावा असे अनेकांचे मत आहे मात्र तसे होऊ देऊ नका मुद्दाम सोशल मीडियावरुन बोलणाऱ्यांना आपण उत्तर देत नव्हतो मात्र आता उत्तर देऊ. सगळे कामे मी करुन घेत आहे. या जीआरमधून सर्व मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जाईल. त्यामुळे थोडे पोट दुखत असते. तुम्ही फक्त शांत रहा संयम ठेवा" असं आवाहनही त्यांनी केले आहे.
"मराठ्यांनी जीवाची बाजी लावली. या लढाईला यश मिळाले ते सर्व मराठा बांधवांचे आहे. त्यांनीच सर्व मिळवले मी नाममात्र आहे. माझ्या प्रत्येक निर्णयानंतर सुरुवातीला असे करायला नको होते असं वाटतं. मात्र पुन्हा पाटलांनी केले ते बरोबरच आहे, अस म्हणायची वेळ येते. आपल्यातीलच काही लोक टीका करत आहेत. दिशाभूल करत आहेत पण जे विरोधात बोलत आहेत त्यांनी ७० वर्षात काही दिलेलं नाही," अशी टीकाही मनोज जरांगेंनी केली.