Beed News: 'संतोष भैय्यानंतर तुझाच नंबर होता'; मनोज जरांगेंचे सहकारी काळकुटेंना जीवे मारण्याची धमकी

Beed Crime News: बीड जिल्ह्यातील परळी येथे ही धमकी देण्यात आली असून, धमकी देणारा व्यक्ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कथित समर्थक असल्याचे बोलले जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे ही धमकी देण्यात आली असून, धमकी देणारा व्यक्ती माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कथित समर्थक असल्याचे बोलले जात आहे. या धमकी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची NDTV मराठी पुष्टी करत नाही.

ऑडिओ कॉलमध्ये काय?

गंगाधर काळकुटे यांना पैलवान सतीश नावाच्या एका व्यक्तीने फोन केला. धमकी देणाऱ्याने काळकुटेंना उद्देशून म्हटलं की, "संतोष भैय्या नंतर दुसरा नंबर तुझाच होता." याशिवाय, त्या व्यक्तीने काळकुटे यांना धनंजय मुंडे यांच्या परळीतील जगमित्र कार्यालयात एकटे येण्याचे आव्हान दिले. धनंजय मुंडे यांचा जाहीर निषेध करता आणि त्यांना बदनाम करता, यामुळे ही धमकी दिल्याचे ऑडिओ कॉलमध्ये ऐकू येत आहे.

(नक्की वाचा-  सरकारी कार्यालयातील भंगार विकून सरकार मालामाल! 7 'वंदे भारत' ट्रेन खरेदी करता येतील एवढी कमाई)

कोण आहेत गंगाधर काळकुटे?

बीड येथील मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे हे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे खांदे समर्थक तथा अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. गेल्या 25 वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षण चळवळीत ते लढा देत आहेत. राष्ट्रीय छावा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी गंगाधर काळकुटे यांनी अर्ज भरला होता. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका बदलली, त्यामुळे आपण अर्ज मागे घेतला असल्याची माहिती गंगाधर काळकुटे यांनी दिली होती. धनंजय मुंडे यांनी देखील गंगाधर काळकुटे जुने मित्र असल्याचा उल्लेख केला होता.

Topics mentioned in this article