Beed News : मनोज जरांगेच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक; जरांगे समर्थकांची रात्री घरात घुसून महिलेला मारहाण

Beed News : महिलेच्या घरामध्ये घुसून आमच्या ताफ्याच्या गाडीला का अडवलेस? असा जाब विचारत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली.

जाहिरात
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत महिला आणि तिचा मुलगा किरकोळ जखमी जखमी झाले. महिलेने याबाबत ताफा अडवत वाहन चालकाला जाब विचारला होता. यानंतर रात्री महिलेच्या घरात घुसून तिला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या गंगाधर काळकुटे यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. पाटोदा तालुक्यातील कचारवाडी गावानजीक ही घटना घडली. यात दुचाकीवरील एक महिला आणि तिचा मुलगा खाली पडले होते. त्यावेळी शाब्दिक चकमक झाल्यानंतर हे प्रकरण तेथेच थांबले होते. 

(नक्की वाचा-  Chhaava : छावा चित्रपटावर शिर्के कुटुंबीय आक्रमक, दिग्दर्शकाला राज्यात फिरु न देण्याचा इशारा)

मात्र रात्री त्याच महिलेच्या घरामध्ये घुसून आमच्या ताफ्याच्या गाडीला का अडवलेस? असा जाब विचारत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली. तसेच काठीने मारहाण केल्याची घटना बीडच्या संभाजीनगर भागात घडली. 

(नक्की वाचा- कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)

या प्रकरणी सदरील महिलेच्या तक्रारीवरून तीन अनोळखी व्यक्ती विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता हे तीन हल्लेखोर कोण होते? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article