'छगन भुजबळ मुकादम' जरांगेंच्या नव्या दाव्याने वाद पेटणार

आम्ही धनगर व ओबीसी नेत्याला विरोधक मानत नाहीत. मात्र केवळ छगन भुजबळ हे सर्व घडवून आणत आहेत. त्यांचाच मराठी विरूद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा डाव आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
बीड:

स्वानंद पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नव्या वक्तव्याने पुन्हा एकदा छगन भुजबळ विरुद्ध जरांगे यांच्यात वाद उफाळण्याची शक्यता आहे.छगन भुजबळ हे मुकादम आहेत. त्यांनी सर्वांना काम ठरवून दिले आहे. त्यानुसार काही लोक बोलत आहेत.असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.आम्ही ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना दोष देणार नाही. गाव खेड्यात आमचे बांधव आहेत.आमचे त्यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. आम्ही धनगर व ओबीसी नेत्याला विरोधक मानत नाहीत. मात्र केवळ छगन भुजबळ हे सर्व घडवून आणत आहेत. त्यांचाच मराठी विरूद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा डाव आहे असे ते म्हणाले.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मला सर्व समाज सारखा आहे

मला सर्व समाज सारखा आहे, असे जरांगे म्हणाले. समाजासाठी काम करतो. पालक मंत्री तुमचा असल्यामुळे मराठा समाजावर अन्याय करता का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. भुजबळ यांनी सांगितले होते. रॅली घेऊन जा व तुम्हीच गाड्या फोडा, परंतु यातून माझ्या मराठा बांधवांना त्रास होत आहे असं सांगायला जरांगे विसरले नाहीत. पुढे त्यांनी फडणवीस यांनाही इशारा दिला आहे. ते म्हणाले माझ्या मराठ्यांना त्रास देऊ नका, आमचा संयम ढलू देऊ नका.  

ट्रेंडिंग बातमी - कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ

अंबडमध्ये ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक 

अंबडमध्ये जाणीवपूर्वक आंदोलन सुरू केले, असा आरोपही जरांगे यांनी केला. त्यांना वाद घडवून आणायचे असे वाटते. ओबीसींसाठी उपोषण ही वडीगोद्रीमध्ये सुरू करायला सांगितले. तर छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरूच मातोरीमध्ये दगडफेक घडवून आणायला सांगितले. गाड्यांची तोडफोड केली. पण याचा त्रास मराठा समाजाला होणार नाही याची काळजी फडणवीसांनी घ्यावी असेही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांचे टेन्शन वाढले, शरद पवार आता गडातच मोठा धक्का देणार

शिव स्मारक कधी होणार? 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कधी होणार आहे असा प्रश्नही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. विनायक मेटे यांचे हे स्मारक व्हावे असे स्वप्न होते. ते आता पुर्ण व्हावे यासाठीही आपण लढा देणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणावर आपण ठाम आहोत. हे आरक्षण आमच्या अटी शर्ती नुसार मिळावे असेही त्यांनी सांगितले. 

Advertisement