राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजने नुसार राज्यातील महिलांना दरमहा 1500 रूपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेचा लाभ नक्की कोणत्या महिलांना होणार आहे याची चर्चा सुरू झाली आहे. याबातमीतून कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? कोणती कोणती कागदपत्र लागतील? अर्ज कुठे भरावे लागेल? ही संपुर्ण माहिती याबातमीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या योजनेचा लाभ कोणाला?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 60 वर्ष आहे त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापर्यंत आहेत त्याच महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. आधार लिंक असणाऱ्या खात्यात या योजने अंतर्गत थेट दिड हजार रूपये जमा होणार आहेत.
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
ज्या पात्र महिला आहेत त्याना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल. योजनेचे अर्ज पोर्टल,मोबाइल अॅप,सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात जावून अर्ज करता येईल. अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे. शिवाय त्याला अर्जा सोबत आधारकार्ड, रेशनकार्ड , उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि फोटो आवश्य लागणार आहेत. त्याच बरोबर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही द्यावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण पणे विनामुल्य असेल. शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे.
पैसे कधी जमा होणार?
या योजनेसाठी 1 जुलै 2024 पासून अर्ज करता येणार आहे. 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तर 16 जुलैला तात्पुरती पात्र लाभार्थिंची यादी प्रकाशीत केली जाईल. तर 1 ऑगस्टला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. 14 ऑगस्टला प्रत्यक्षात खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतर दर महिलन्याच्या 15 तारखेला हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.
योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ?
ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा पक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या शिवाय घरता कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल. ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र समजली जाईल. शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world