Video : 'मराठी गया तेल लगाने' म्हणणाऱ्या L&Tच्या सुरक्षा रक्षकाच्या तोंडातून शब्दाही फुटेना, मनसैनिकांकडून कानाखाली 'महाप्रसाद'

मराठी येत नसेल तर ती भाषा शिका. मात्र त्याचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही असंही मनसैनिक यावेळी म्हणाले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

MNS on Marathi : मुंबई ही देशातच काय पण जगभरातील कोणत्याही व्यक्तीला जगवू शकते. इथं कोणी उपाशी राहू शकत नाही. कित्येक राज्यातील नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येतात आणि इथंच विसावतात. मात्र सर्वांनाच इथली भाषा स्वीकारता येते असं नाही. परराज्यातील असल्यामुळे मराठी बोलता येत नसणारे आणि विशेष म्हणजे त्याची गरज वाटत नसणारे अनेकजण वारंवार मराठीचा अपमान करीत असल्याच्या घटना समोर येत असतात. असाच एक प्रकार पवईतून समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पवईतील L&T च्या सुरक्षा रक्षकाची एका मराठी व्यक्तीसोबत काही कारणामुळे वाद झाला. यातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र हा सुरक्षा रक्षक उत्तरेकडील असल्यामुळे त्याला मराठी बोलता येत नव्हतं. याशिवाय मराठी येत नसल्याचं छातीठोक पणे सांगणाऱ्या या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी  चांगलीच अद्दल घडवली. मनसैनिकांनी त्याला चांगलीच समज दिली. आधी त्याला कानशिलात लगावली आणि मराठीचा अपमान केल्याबद्दल संताप व्यक्त केला. मनसैनिकांकडून नेहमीच मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जातो. यंदाही पवईमधील  L&T मध्ये 'मराठी गया तेल लगाने' म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाच्या कानाखाली लगावण्यात आली. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Akola News : 'मृत्यूनंतर पत्नीला माझा चेहरा दाखवू नका', व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत तलाठ्याने संपवलं जीवन

मराठी येत नसेल तर शिकायला हवं आणि हे शांतपणे बोलायला हवं. 'मराठी गया तेल लगाने' असं म्हणत मराठी भाषेचा अपमान करणं योग्य नसल्याचं मनसैनिकांनी यावेळी सांगितलं. मराठी येत नसेल तर ती भाषा शिका. मात्र त्याचा अवमान करणाऱ्याला सोडणार नाही असंही मनसैनिक यावेळी म्हणाले. 

Advertisement

सुरक्षा रक्षक मराठी का नाही?
L&T च्या सुरक्षा एजन्सी मराठी कर्मचाऱ्यांना नोकरीवर का ठेवत नाही असा सवाल मनसैनिकांनी यावेळी उपस्थित केला. अधिकतर ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून उत्तर भारतातील लोकांना का ठेवलं जातं, याबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला. 
 

(मुख्य व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा...)