आरक्षणासाठी मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक, हिंगोलीत राजकीय नेत्यांना गावबंदी

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय नेत्यांना गावबंदीचे पोस्टर लावण्यात आले होते. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राजकीय नेत्यांना गावबंदीचे पोस्टर लागायला सुरुवात झाली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

समाधान कांबळे, हिंगोली

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आधी मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणावरुन हिंगोलीतील मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहे. राजकीय नेत्यांना गावबंदीचे ठिकठिकाणी बॅनर देखील लागले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंगोली जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय नेत्यांना गावबंदीचे पोस्टर लावण्यात आले होते. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राजकीय नेत्यांना गावबंदीचे पोस्टर लागायला सुरुवात झाली आहे. 

(नक्की वाचा-  लोकसभेच्या निकालानंतर महायुती सरकार 'टॉप गियर'वर; योजना, विकासकामांचा धडाका)

वसमत तालुक्यातील गुंडा, पांगरा शिंदे यासह जिल्ह्यातील काही गावांमध्ये  राजकीय नेत्यांना पुन्हा एकदा सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावबंदीचे पोस्टर गावांमध्ये लावण्यात येत आहेत. मनोज जरांगे पाटलांचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत मराठा समाज राजकीय नेत्यांना गावात येऊ देणार नाही, असा ठाम निर्धार मराठा बांधवांकडून करण्यात आला आहे.

सकल मराठा समाजाचे विठ्ठल शिंदे यांना याबाबत म्हटलं की, आम्ही सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. राजकीय नेता कसा असावा तर त्याचा एक पाय जनतेमध्ये असावा आणि एक पाय विधिमंडळामध्ये असावा. त्या नेत्याने जनतेचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडून ते सोडवले पाहिजेत. 

(नक्की वाचा-  बैठका, चर्चा पण तिढा कधी सुटणार? महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत अपडेट)

मागील एका वर्षापासून आमचं सतत आंदोलन सुरू आहे. आमचा नेता मरणाच्या दारातून चार वेळा परत आला आहे. तरी राजकीय नेत्यांना आणि सरकारला जाग येत नसेल तर त्यांना आमच्या गावामध्ये येण्याचा कुठलाही अधिकार नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधक असो आजपासून मनोज जरांगे पाटील जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वच राजकीय नेत्यांना गावबंदी करू, असा निर्धार सकल मराठा समाज बांधवांकडून करण्यात आला आहे.

Topics mentioned in this article