Marathwada Dam Water Level Storage: मे महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. खरीप, रब्बी हंगामासह उन्हाळी पिकांनाही पाणी उपलब्ध होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणांमध्ये गेल्यावर्षी आजच्या दिवशी 12.92 टक्के पाणीसाठा होता. मात्र आज 23.52 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी हा मोठा दिलासा समजला जात आहे. दरम्यान याच धरणांमधील गेल्या दोन वर्षाची आकडेवारी काय सांगते? जाणून घ्या...
Pune Dam Water Level: पुणे शहरावर मान्सून मेहरबान! धरणांचा पाणीसाठा वाढला; कोणते धरण किती भरले?
कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा?
जायकवाडी
आजचा पाणीसाठा : 43.08 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 4.54 टक्के
निम्न दुधना
आजचा पाणीसाठा : 35.52 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 0.81 टक्के
येलदरी
आजचा पाणीसाठा : 50.75 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 27.43 टक्के
सिध्देश्वर
आजचा पाणीसाठा : 21.56 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 00 टक्के
माजलगांव
आजचा पाणीसाठा : 11.54 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 00 टक्के
मांजरा
आजचा पाणीसाठा : 27.59 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 00 टक्के
पेनगंगा :
आजचा पाणीसाठा : 51.69 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 28.57 टक्के
मानार
आजचा पाणीसाठा : 52.56 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 22.22 टक्के
यंदा जुलै महिन्यातच धरणं भरणार? धुवांधार पावसामुळे पाणी पातळी कितीने वाढली?
निम्न तेरणा
आजचा पाणीसाठा : 70.17 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 14.00 टक्के
विष्णुपूरी
आजचा पाणीसाठा : 23.22 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 30.34 टक्के
सिना कोळेगांव
आजचा पाणीसाठा : 48.09 टक्के
गेल्यावर्षी पाणीसाठा : 00 टक्के