
(Maharashtra Rain) यंदा राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्याने पावसाने देखील लवकर हजेरी लावली. राज्यातील अनेक भागात गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. तर नाशिक परिसरातील गोदावरी नदीला पूर (Godavari river floods) आला असून, धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ होत आहे. फक्त नाशिकच नाही तर राज्यातील सर्वच विभागातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ होत आहे. राज्यातील 2 हजार 997 छोट्या मोठ्या धरणांमध्ये आज घडीला 39.08 टक्के पाणीसाठा आहे. ज्यात सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात पाहायला मिळतोय. असाच पाऊस सुरू राहिल्यास जुलै महिन्यातच राज्यातील अनेक महत्त्वाचे धरण (Maharashtra Dam Water Level in June) भरण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात जून महिन्यात गेल्या 23 दिवसात 315 मिलिमीटर पाऊस कोसळला असून या पावसाने 2017 सालचा उच्चांक मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील धुवाधार पाऊस होत असून यामुळे जिल्ह्याचा धरण साठा 43 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. दारणा, गंगापूर यासोबतच कादवा धरणातून तीन दिवसांपासून विसर्ग सुरू असून यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येते आहे. गंगापूर धरणातून रात्री पाण्याचा विसर्ग 6160 एवढा करण्यात आल्याने रामकुंड परिसरात पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे.
नक्की वाचा - Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर
राज्यातील धरणातील पाणीसाठा विभागनिहाय
नागपूर
धरणांची संख्या : 383
पाणीसाठा : 31.26 टक्के
अमरावती
धरणांची संख्या : 264
पाणीसाठा : 39.10 टक्के
छत्रपती संभाजीनगर
धरणांची संख्या : 920
पाणीसाठा : 32.32 टक्के
नाशिक
धरणांची संख्या : 537
पाणीसाठा : 38.22 टक्के
पुणे
धरणांची संख्या : 720
पाणीसाठा : 43.18 टक्के
कोकण
धरणांची संख्या : 173
पाणीसाठा : 46.63
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world