
गणित हा अनेकांसाठी अवघड विषय असतो, मात्र या गणिताचे काही सोपे नियम आहेत, जे लक्षात ठेवले तर गणित रंजक आणि सोपे होते. पाढे, गुणाकार, भागाकार, बेरीज असो अथवा वजाबाकी. गणितामध्ये काही ट्रीक्स असतात ज्यामुळे मोठमोठी आकडेमोड सोपी होत असते. स्पर्धा परीक्षा किंवा स्कॉलरशिपच्या परीक्षेत गणिताशी निगडीत असे प्रश्न विचारले जातात ज्यामुळे चक्रावून जायला होतं. मात्र शांतपणे विचार केला आणि काही सोप्या ट्रीक्स वापरल्या तर हे प्रश्न एका सेकंदात सोडवले जाऊ शकतात. असा प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे तो म्हणजे 1 ते 100 मध्ये प्रत्येक अंक कितीवेळा येतो.
नक्की वाचा: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत राग-चिडचिड होते? शरीर देतेय गंभीर संकेत
0 ते 9 अंकांची गंमत
1 ते 100 मध्ये शून्यापासून 9 अंकापर्यंत प्रत्येक आकडा कितीवेळा येतो याचा अनेकजण विचार करत नाही, मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण प्रत्येक आकडा कितीवेळा येतो ते पाहूया
- शून्य- 10 ते 100 मध्ये एकूण 11 वेळा येतो. (10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 मध्ये दोन शून्य)
- एक- 1 ते 100 मध्ये एकूण 21 वेळा येतो. (1, 10 ते 19, 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91, आणि 100 मधील 1)
खरी गंमत यापुढे सुरू होते. गणितासह इतर विषय शिकवणाऱ्या शिंदे मॅडमने फळ्यावर मांडून दाखवत सांगितले की 2 पासून 9 पर्यंतचा विचार केला तर प्रत्येक आकडा हा 20 वेळा येतो.
आपण 9 संख्या घेऊन हे उत्तर समजून घेऊयात.
एकक स्थानी '9' येणाऱ्या संख्या: 9, 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89, 99 (एकूण 10 वेळा)
दशक स्थानी '9' येणाऱ्या संख्या: 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99 (एकूण 10 वेळा)
शिंदे मॅडमन नावाने सोशल मीडिया हँडलवर सध्या व्हायरल झालेल्या या पुण्यामधील एक शिक्षिका आहे, ज्या गणिताच्या ट्रीक्स सर्वसामान्यांना कळाव्यात यासाठी सोशल मीडियावर त्या समजावून सांगत असतात. शिंदे मॅडम असे त्यांचे सोशल मीडिया हँडल असून यावरून त्या गणितासह इतर विषयां चे धडे देत असतात. त्यांच्या याच हँडलवरून त्यांनी शून्यापासून शंभरापर्यंत प्रत्येक आकडा कितीवेळा येतो हे समजावून सांगितले आहे. बातमीच्या सुरुवातीला तुमचे उत्तर बरोबर होते का ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवत नक्की कळवा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world