Salman Khan News: सौदी अरेबियातील जेद्दा शहरात पार पडलेल्या रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानने उपस्थिती दर्शवली होती. त्याच्या उपस्थितीमुळे प्रेक्षकांमध्ये नेहमीप्रमाणे उत्साह पाहायला मिळाला. पण सलमान खानने केलेल्या वक्तव्यामुळे त्याचे चाहते हैराण झाले. सलमान खानने म्हटलं की, मी स्वतःला महान अभिनेता समजत नाही. फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका सत्रादरम्यान बातचित करताना सलमानने करिअरबाबत माहिती सांगताना हे विधान केलं.
सलमान खानने केला खुलासा
स्वतःची प्रसिद्धी, वासरा किंवा गाजलेल्या सिनेमांवर प्रकाश टाकण्याऐवजी सलमानने (Salman Khan News) एक गंमतीशीर खुलासा करत चाहत्यांना आश्चर्यचकित केले. मी स्वतःला महान कलाकार मानत नाही, असे म्हणताच चाहते हैराण झाले. तसेच अभिनय शैलीबाबत विचारताच त्याने म्हटलं की, "अभिनय कौशल्य देखील या पिढीतून निघून गेलंय".
(नक्की वाचा: Dhurandhar Box Office Collection: धुरंधरची बॉक्सऑफिसवर छप्परफाड कमाई, 'पुष्पा 2'लाही टाकलं मागे, पुणेकरांसाठी गुड न्यूज)
जेव्ही मी रडतो तेव्हा तुम्ही...: सलमान खान
59 वर्षांच्या सलमान खानने (Salman Khan News) गंमतीशीर पद्धतीने म्हटलं की, "मी खूप चांगला अभिनेता आहे, असं मला वाटत नाही. तुम्ही मला काहीही करताना पकडू शकता, पण मला अभिनय करताना पकडू शकत नाही. मला अभिनय करता येत नाही. माझं मन जे सांगतं तेच मी करतो". सलमानचे हे म्हणणं ऐकताच चाहत्यांमध्ये हशा पिकला. होस्टने यावर प्रेक्षकांचं मत विचारताच लोकांनी 'नाही' असे उत्तर दिले. पुढे सलमान खानने असंही म्हटलं की, "जेव्हा कधी-कधी मी रडतो, तेव्हा मला वाटतं की तुम्ही माझ्यावर हसताय".
(नक्की वाचा: Dhurandhar Akshaye Khanna: गदर फेम अभिनेत्रीकडून अक्षय खन्नाचं कौतुक, म्हणाली: सर्वांचे डोळे उघडले... सर्वांना चपराक...)
दरम्यान सलमान खानने यावेळेस चित्रपट उद्योगांमधील वाढत्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचे कौतुक केले. फिल्म फेस्टिव्हलबाबतही त्यानं म्हटलं की, "मला सौदी अरेबिया आवडतं, येथील संस्कृती आवडते. आजकाल या ठिकाणास मी अनेकदा भेट देतोय."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
