Mazi Ladki bahin yojna :एकाच Video मध्ये e-kyc संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं; आदिती तटकरेंनी VIDEO केला शेअर

व्हिडिओमध्ये त्यांनी E-KYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Mazi Ladki bahin yojna e-kyc : महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-kyc बाबत घोषणा केल्यानंतर दोन दिवस उलटले आहेत. मात्र अद्यापही लाडक्या बहिणींना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळू शकलेली नाही. मोबाइलवरुन e-kyc होत नसल्याने लाभार्थी महिला सायबर कॅफेबाहेर गर्दी करीत आहेत. मात्र e-kyc करताना त्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

दरम्यान आदिती तटकरे यांनी आज (21 सप्टेंबर) एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून e-kyc ची सविस्तर प्रक्रिया सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी फ्लोचार्ट शेअर केला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सविस्तरपणे सांगण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून e-kyc करणं सोपं जाऊ शकतं. 

नक्की वाचा - Mazi Ladki bahin yojna : e-kyc कधी होणार? ओटीपी येईना, वेबसाइट लोड होईना; लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं

आदिती तटकरे यांनी व्हिडिओसोबत लिहिलंय, E-KYC.. सहज, सोपी व लाडक्या बहिणींच्या हिताची प्रक्रिया ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींनी लवकरात लवकर E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती. सदर प्रक्रिया अत्यंत सहज व सोपी असून योजनेच्या पुढील सुलभ वाटचालीसाठी आवश्यक आहे. याबाबत संपूर्ण माहिती सदर व्हिडिओमध्ये दिली असून, E-KYC प्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक आहे.

Advertisement