
Central Railway Mega Block: मध्य रेल्वे रविवारी (1 जून) उपनगरीय विभागांत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्टेशनदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 वाजेपासून ते ते दुपारी 3.55 पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्टेशनदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्टेशनवर थांबतील. पुढे विद्याविहार स्टेशनवर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
घाटकोपर स्टेशनवरुन सकाळी 10.19 वाजेपासून ते दुपारी 3.52 वाजेपर्यंत विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्टेशनदरम्यान अप-जलद मार्गावर चालवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्टेशनवर थांबतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजेपासून ते संध्याकाळी 4.40.वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजेपासून ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.
(नक्की वाचा: Dharavi News : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला सरकारची मंजुरी; काय आहेत मुख्य वैशिष्ट्ये)
कोणकोणत्या सेवा बंद राहतील?
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 ते संध्याकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 वाजेपर्यंत ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 वाजेपासून ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 वाजेपासून ते संध्याकाळी 4.13 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाइन सेवा बंद राहतील.
- ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक आठ) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- ब्लॉक काळात हार्बर लाइनवरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world