सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळावीत म्हणून दरवर्षी घरांची सोडत काढणाऱ्या म्हाडाकडून (MHADA lottery) पुन्हा एकदा मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हाडाच्या (MHADA kokan mahamandal) कोकण मंडळातर्फे ठाणे शहर, जिल्हा, वसई येथे 5 हजार 286 सदनिका सोडत जाहीर करण्यात आली आहे. 14 जुलै रोजी 1 वाजता म्हाडाच्या उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडतीसाठी (MHADA announces lottery for 5,285 houses) अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे.
याशिवाय विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 सदनिका आणि ओरोस (जिं. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर या भागात 77 भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे.
कसं असेल वेळापत्रक?
13 ऑगस्ट - रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत
14 ऑगस्ट - रात्री 11.59 वाजेपर्यंत रक्कम भरण्याची मुदत
21 ऑगस्ट - सायंकाळी 6 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल
25 ऑगस्ट - सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदविता येणार
1 सप्टेंबर - सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होईल.
3 सप्टेंबर - सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाईल.