जाहिरात

MHADA lottery : घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून 5285 घरांची लॉटरी, 77 भूखंडांचीही संधी; कधीपर्यंत अर्ज करू शकता? 

सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळावीत म्हणून दरवर्षी घरांची सोडत काढणाऱ्या म्हाडाकडून पुन्हा एकदा मोठी घोषणा करण्यात आली आहे.

MHADA lottery : घराचं स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून 5285 घरांची लॉटरी, 77 भूखंडांचीही संधी; कधीपर्यंत अर्ज करू शकता? 

सर्वसामान्यांना परवडणारी घरं मिळावीत म्हणून दरवर्षी घरांची सोडत काढणाऱ्या म्हाडाकडून (MHADA lottery) पुन्हा एकदा मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हाडाच्या (MHADA  kokan mahamandal) कोकण मंडळातर्फे ठाणे शहर, जिल्हा, वसई येथे 5 हजार 286 सदनिका सोडत जाहीर करण्यात आली आहे. 14 जुलै रोजी 1 वाजता म्हाडाच्या उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडतीसाठी (MHADA announces lottery for 5,285 houses) अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे. 

याशिवाय विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 सदनिका आणि ओरोस (जिं. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर या भागात 77 भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. 

Latest and Breaking News on NDTV

 

नक्की वाचा - New Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 13,000 कर्मचारी कार्यरत,CM फडणवीसांनी दिलं हे टार्गेट

कसं असेल वेळापत्रक?

13 ऑगस्ट - रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत
14 ऑगस्ट - रात्री 11.59 वाजेपर्यंत रक्कम भरण्याची मुदत
21 ऑगस्ट - सायंकाळी 6 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल
25 ऑगस्ट - सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदविता येणार
1 सप्टेंबर - सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होईल.
3 सप्टेंबर - सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com