MHADA Lottery 2026: मुंबईसारख्या महानगरात हक्काचे घर असावे, हे प्रत्येक मध्यमवर्गीयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे आहेत. खासगी विकासकांच्या प्रकल्पांतील घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असताना, म्हाडा (MHADA) मुंबई मंडळाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील सुमारे २५०० घरांसाठी एप्रिल २०२६ मध्ये भव्य संगणकीय सोडत काढण्याची तयारी म्हाडाने पूर्ण केली आहे.
म्हाडाकडून लॉटरी निघणार
समोर आलेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून या सोडतीची अधिकृत जाहिरात मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला जाईल. अर्जांची तांत्रिक छाननी पूर्ण झाल्यानंतर एप्रिलअखेरपर्यंत अंतिम सोडत जाहीर केली जाईल.
२०२४ मधील सोडतीमध्ये घरांच्या किमती प्रचंड वाढल्याने सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली होती. २०२५ मध्ये कोणतीही मोठी सोडत न निघाल्याने घरांची प्रतीक्षा लांबली होती. मात्र, आता मुंबई मंडळाने गोरेगाव, मुलुंड, चेंबूर आणि विक्रोळी यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी घरांची उपलब्धता करून दिली आहे. या सोडतीची अधिकृत जाहिरात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
Pune News: संतापजनक! भाड्यावरून वाद, कॅब चालकाने आयटी इंजिनिअरचे बोट चावून तोडले
अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुकांना एक महिन्याचा कालावधी मिळेल आणि एप्रिलच्या अखेरीस संगणकीय सोडत जाहीर केली जाईल. यामध्ये विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी सर्वाधिक १२२१ घरे उपलब्ध आहेत, तर गोरेगाव पत्राचाळ येथे अल्प उत्पन्न गटासाठी ८५ घरे प्रस्तावित आहेत. जरी काही ठिकाणी किमती कोटीच्या घरात असल्या, तरी मुंबईतील खाजगी बाजारपेठेच्या तुलनेत या किमती आजही किफायतशीर मानल्या जात आहेत.
कोणत्या लोकेशनवर मिळणार घरे?
या सोडतीत प्रामुख्याने बोरिवलीतील मागाठाणे, विक्रोळी आणि सायनमधील प्रतीक्षा नगर यांसारख्या मोक्याच्या ठिकाणांचा समावेश आहे. पारदर्शक प्रक्रियेद्वारे मध्यमवर्गीयांना मुंबईत हक्काचे घर मिळवून देण्याचा म्हाडाचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यापैकी विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी सर्वाधिक १२२१ घरे उपलब्ध आहेत, तर गोरेगाव पत्राचाळ येथे अल्प उत्पन्न गटासाठी ८५ घरे प्रस्तावित आहेत. जरी काही ठिकाणी किमती कोटीच्या घरात असल्या, तरी मुंबईतील खाजगी बाजारपेठेच्या तुलनेत या किमती आजही किफायतशीर मानल्या जात आहेत.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यात गॅस सिलेंडरचे वितरण फक्त 'या' माध्यमातूनच होणार, किती तासांत घरपोच होणार? वाचा सर्व डिटेल्स
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world