MHADA Mumbai Lottery: स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! मुंबई म्हाडाकडून 5000 घरांची लॉटरी निघणार, कधी अन् कुठे?

मुंबई मंडळाने सुमारे ५ हजार घरांच्या सोडतीची तयारी पूर्ण केली असून, याची अधिकृत जाहिरात मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai MHADA Lottery:  मुंबईमध्ये आपल्या हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. मात्र घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून हे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. मात्र मुंबई म्हाडाने मायानगरी मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी गूड न्यूज दिली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं 2026 मध्ये किमान 5 हजार घरांची सोडत काढण्याची तयारी पूर्ण केली आहे. याची जाहिरात मार्चअखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

मुंबई म्हाडा लॉटरी...

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईत हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या वर्षी घरांच्या उपलब्धतेअभावी रखडलेली म्हाडाची सोडत यंदा २०२६ मध्ये मोठ्या थाटात पार पडणार आहे. मुंबई मंडळाने सुमारे ५ हजार घरांच्या सोडतीची तयारी पूर्ण केली असून, याची अधिकृत जाहिरात मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

HSRP Deadline: एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठीची मुदत काय? यापुढे एकही संधी मिळणार नाही

२०२५ मध्ये नवीन घरांचा साठा उपलब्ध नसल्यामुळे म्हाडाला सोडत काढता आली नव्हती. ही कसर भरून काढण्यासाठी मंडळाने यंदा 'निर्माणाधीन' घरांचाही या प्रक्रियेत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये गोरेगावची पत्राचाळ, विक्रोळी आणि सायनमधील प्रतीक्षानगर येथील प्रकल्पांचा प्रामुख्याने समावेश आहे. जरी या घरांची सोडत आता निघणार असली, तरी विजेत्यांना ताबा मिळवण्यासाठी २०२७ ते २०२९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

कुठे मिळणार हक्काचे घर..? 

​या सोडतीचा मुख्य केंद्रबिदू 'पत्राचाळ' पुनर्विकास प्रकल्प ठरणार आहे. येथे सुमारे २५०० घरे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय मागाठाणे येथील २० मजली इमारतीत उच्च उत्पन्न गटासाठी १२८ घरे असतील, ज्याचे काम २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. प्रतीक्षानगरमध्ये २२ मजल्यांच्या तीन इमारतींचे काम अंतिम टप्प्यात असून, तेथे मध्यम गटासाठी २६४ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच कन्नमवारनगर आणि चेंबूरच्या टिळकनगरमध्येही मध्यम व अल्प गटासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती सुरू आहे.

Advertisement

Mumbai News: खोटी कागदपत्रे, अवैध वास्तव्य.. मुंबईत बांगलादेशी घुसखोरांना दणका, पोलिसांची सर्वात मोठी कारवाई