Ajit Pawar : "अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही", हसन मुश्रीफांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

मुश्रीफ यांनी पक्षाची आगामी निवडणुकीबाबतची भूमिकाही स्पष्ट केली. "जिथे जमेल तिथे युती, जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर," हे पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली

Hasan Mushrif Speech : राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरण्याचा प्रयत्न केला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आयोजित एका युवा संवाद मेळाव्यात बोलताना त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही." हसन मुश्रीफ यांचे हे भाषण अजित पवार यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा अधोरेखित करणारे आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस ही एकमेव असा पक्ष आहे, जो युतीत असूनही छत्रपती, शाहू, फुले आणि आंबेडकरांचा पुरोगामी विचार सोडत नाही.

(नक्की वाचा- Mumbai News: मुंबईत राहणाऱ्या हिंदी भाषिकांना मराठी भाषा शिकण्याचे अभियान, 'या' पक्षाने घेतली जबाबदारी)

मुश्रीफ यांनी पक्षाची आगामी निवडणुकीबाबतची भूमिकाही स्पष्ट केली. "जिथे जमेल तिथे युती, जिथे जमणार नाही तिथे स्वबळावर," हे पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची रणनीती असेल, असंही मुश्रीफ म्हणाले.

(नक्की वाचा-  Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला)

युवा संवाद मेळाव्यात बोलताना मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा मंत्र दिला. त्यांनी म्हटले की, "येणाऱ्या निवडणुकांमध्ये युतीचा झेंडा कसा लागेल आणि त्यामध्येही राष्ट्रवादीचा झेंडा कसा फडकेल, यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे. कार्यकर्त्यांना एकजुटीने आणि जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Topics mentioned in this article