
मराठी भाषेवरून सध्या मुंबईत आक्रमक आंदोलनं होताना दिसत आहे. खास करून मनसे आणि शिवसेनेनं याबाबत आक्रमक भूमीका घेतल्याचे पाहायला मिळालं आहे. मुंबईत राहाणाऱ्याला मराठी यायलाच पाहीजे असा आग्रह होत आहे. त्यात काही जण त्याला विरोध करत आहेत. त्यांना मात्र फटके बसताना गेल्या काही दिवसात दिसले आहेत. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले आहे. यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या पार्श्वभूमिवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने एक अभिनव अभियान हाती घेतले आहे.
पक्षाच्या हिंदी भाषिक सेलच्या वतीने महाराष्ट्रातील हिंदी बांधवांना मराठी शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालय येथे झाली आहे. या अभियानाचे आयोजक हिंदी भाषिक सेलचे अध्यक्ष मनीष दुबे यांनी केले आहे. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, मिलिंद कांबळे, असलम शेख, अभय पांडे, अजय यादव, शैलेन्द्र यादव, जैनुल अंसारी, रंजित चौधरी, राजेंद्र चंदेल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते.
नक्की वाचा - MNS News: '15 दिवसात डान्सबार बंद करा नाहीत तर...', मनसेचा थेट इशारा
मुंबईत राहणाऱ्या हिंदी भाषिक नागरिकांना मराठीचे धडे दिले जाणार आहेत. त्यांना मराठी शिकवण्याकरिता अभियान आज पासून सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंदी भाषिक सेलचे अध्यक्ष मनीष दुबे यांनी हे अभियान सुरू केले आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी अभिनयाची उद्घाटन नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
Panvel MNS News: राज ठाकरेंचे भाषण, काही तासात मनसेचे 'खळ-खट्याक'; पनवेलमध्ये लेडीज बार फोडला
या अभियानाची सुरुवात मुंबईतील बोरवली आणि दहिसर या परिसरातून करण्यात येणार आहे. हे अभियानाच्या प्रयोगीक तत्त्वावर या परिसरातून सुरू करण्यात येणार आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले. यातून अनेक हिंदी भाषीकांचा मराठी शिकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय मराठी येत असल्याने वादाचा प्रश्नही निर्माण होणार नाही. कटुताही निर्माण होणार नाही. मुंबईत राहाणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच पाहीजे अशी भूमीक शिवसेना आणि मनसेची आहे. त्याला अन्य पक्षांनीही पाठींबा दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world