'मिरज पॅटर्न'ने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली? महायुतीला होणार फायदा 

Sangli Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मिरजमध्ये भाजपला काँग्रेसचा पाठिंबा मिळताना दिसत आहेत. मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवक आपल्या पाठीशी राहणार असल्याचं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती आमने-सामने असणार आहे. युती आणि आघाडीचे सर्वच पक्षांना यासाठी तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र सांगलीच्या मिरज विधानसभा मतदारसंघात वेगळी युती पाहायला मिळत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीसाठी मिरजमध्ये भाजपला काँग्रेसचा पाठिंबा मिळताना दिसत आहेत. मिरज विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय माजी नगरसेवक आपल्या पाठीशी राहणार असल्याचं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील मिरज पॅटर्न विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या सोबत असणार हे स्पष्ट झालं आहे.

(नक्की वाचा- ठाकरे गटाच्या नेत्याची तोतयागिरी?, 'त्या' पत्रामुळे अडचण वाढण्याची शक्यता)

विशेष म्हणजे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक संजय मेंढे आणि माजी नगरसेवक करण जामदार यांनी उपस्थित लावली होती. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकत्रित येत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत जाहीर प्रचार केला होता.

(नक्की वाचा- सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; वडेट्टीवारांनी सांगितलं मुख्यमंत्री कुणाचा होणार )

आता हाच मिरज पॅटर्न विधानसभा निवडणुकीत भाजपाचे मिरजेचे विद्यमान आमदार व कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे खुद्द खाडे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीसाठी मिरज पॅटर्न डोकेदुखी ठरणार आहे.
 

Advertisement