Rohit Pawar Press Conference On Ajit Pawar Plane Crash Accident: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन संशय व्यक्त केला जात आहे. याबाबतच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या अपघाताला विमान कंपनी कशाप्रकारे कारणीभूत आहे. कोणत्या गोष्टींमध्ये हलगर्जीपणा करण्यात आला, याबाबत त्यांनी महत्त्वाचे खुलासे केले.
काय म्हणाले रोहित पवार?
"विमानात इतके पूर्ण इंधन का भरले होते? बारामती विमान प्रवासात मुद्दाम जास्त इंधन भरले होते का? जर धुक जास्त होते तर मग लॅन्डींग का केली ? तुम्ही तिथ लॅन्डींग मुद्दाम केले का? असा संशय येत आहे. ब्लॅक बाँक्स जळला हे मुद्दाम मॅन्युप्युलिशन आहे. 11 डिग्री सेल्सिअसमध्येच ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. जर ६००० मीटर खोलीपर्यंत पाण्याचे प्रेशर असेल तरी ब्लॅक बॉक्स टिकू शकतो. त्या ठिकाणी कागदही न जळलेले दिसले. याआधी सर्व अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स सुरक्षित होता. अजित पवारांच्याही विमानातील केबल सुरक्षित आहेत" असा मुद्दा रोहित पवार यांनी मांडला.
"तुम्ही एयरलेटचे विमान चालवत असाल तर लेगेसीचे विमान चालवण्याची परवानगी नाही. म्हणजे हे महाशय लेगेसीसुद्धा चालवत होते आणि लेयरजेटही चालवत होते. हे नियमबाह्य आहे.कंपनी खोटी कागदपत्रे करत आहे. त्यामुळे कागदे रंगवायचे सोडून द्या. जर उद्या व्हिडिओ मिळाला तर योग्य ठरणार नाही. अजित पवार यांनी वापरलेले विमान १० कोटी रूपयांच्या आयपास होते आणि विमा २०० कोटी रुपयांचा होता," असंही रोहित पवार म्हणाले.
"२०२३ मध्ये अपघात प्रकरणात चालवणारा सुनील कंजरही कपूरप्रमाणेच दारुमुळे दोनवेळा निलंबित झाला होता. कार्लोस नावाचा माणूस व्हेनोजुलियाचा आहे. हा भारतामध्ये प्रवासी म्हणून येतो अन् तो कॉकपेटमध्ये जावून विमान उडवत होता. वेदर रिपोर्ट वगेरे सर्व डाटा मागवला आहे. टेक्निकली बोलले पाहिजे, मात्र तपास यंत्रणा नीट माहिती देत नाही. डीजीसीए मॉडेलची सुद्धा माहिती चुकीची देत आहे. तारखाही चुकवत आहे. तपास यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा? रिपोर्टमध्ये हेराफेरी होत आहे का? असा सवाल आमचा आहे," असं रोहित पवार म्हणाले.
"व्हीएसआर विना जास्त काळ उडवायचे, वामन इंजिन लाईफ संपली होती. झे प्लस सुरक्षा असून ही सुरक्षा विचार का केला नाही. अजित दादा विमानात बसले होते त्याला ५९१५ तास झाले होते म्हणजे फक्त ८५ तास बाकी होते. अजित पवार हे झेडप्लस सिक्युरिटी असलेले व्यक्त आहेत. मग असे खराब झालेले मशिन कसे काय अजित पवार यांच्या सेवेसाठी दिले. इतके दुर्लक्ष कसे केले गेले?" असा सर्वात मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुणेकरांवर येणार पाणी संकट! पुणे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा, काय आहे प्रकरण?)